Daren Sammy Appeal : ‘भारताला नडलो, पण आता आम्हाला पैशांची गरज!’, मालिका संपताच विंडीज संघाच्या प्रशिक्षकाचे क्रिकेट जगताला भावनिक आवाहन
Daren Sammy Appeal : वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमीने जागतिक क्रिकेटसमोर एक अत्यंत भावूक भूमिका मांडली आहे. ज्यामध्ये त्यांचा क्रिकेट बोर्ड आर्थिक संकाटात असून मदतीचे आवाहन केले आहे

Daren Sammy Emotional Appeal for Financial Backing for West Indies Cricket : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानची पाच सामन्यांची टी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत संपल्यानंतर वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमीने जागतिक क्रिकेटसमोर एक अत्यंत भावूक भूमिका मांडली आहे. मर्यादित संसाधने आणि अनेक अडचणी असूनही कॅरेबियन संघाने जागतिक विजेत्या भारताला मायदेशात कडवी टक्कर दिली. मात्र केवळ आत्मविश्वासावर संघ चालवणे आता शक्य नसून वेस्ट इंडिज क्रिकेटला मोठ्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज असल्याचे सॅमीने स्पष्ट केले.
पावसाने सामना वाया गेला; सामन्यानंतर सॅमी भावूक
बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला पाचवा आणि अंतिम सामना पावसामुळे रद्द करावा लागला. सामन्यानंतर भावना व्यक्त करताना सॅमी म्हणाला की, “माझी आई नेहमी सांगायची की तुमच्या मनात इतरांबद्दल काळजी घेण्याची भावना असली पाहिजे. मला वाटते की आता वेस्ट इंडिज क्रिकेटला खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या आधार देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेची मोठी गरज आहे.” भारताविरुद्ध चमकदार कामगिरी केल्यामुळे आता मदत करू शकणाऱ्या घटकांशी सकारात्मक चर्चा करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आर्थिक संकटातही भारताशी बरोबरीची लढत –
STORY | We need somebody to put a shoulder around WI cricket financially: Coach Daren Sammy
Making an emotional appeal for someone to “put an arm around” West Indies cricket financially, head coach Daren Sammy hoped that a closely-fought series against India will put them in a place to have more meaningful conversations with sponsors to swell the money flow into the struggling Caribbean cricket.
(Report by G Unnikrishnan/PTI)
READ: https://t.co/2aH7mHH5Wt
— Press Trust of India (@PTI_News) October 18, 2026
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड सध्या अत्यंत बिकट आर्थिक टंचाईचा सामना करत आहे. एकदिवसीय मालिकेत २-१ ने पराभव पत्करावा लागल्यानंतरही कॅरेबियन खेळाडूंनी खचून न जाता टी-२० मालिकेत दमदार खेळ केला. भारतासारख्या तगड्या संघाविरुद्ध २५० धावांचे आव्हान पार करत मालिका २-२ ने बरोबरीत राखली. मैदानातील या कामगिरीनंतर सॅमी यांनी क्रिकेट जगताकडे विंडीज क्रिकेटला वाचवण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.
भारताकडे भक्कम व्यवस्था; विंडीजला संघर्षाची साथ –
Making an emotional appeal for someone to “put an arm around” West Indies cricket financially, head coach Daren Sammy hoped that a closely fought series against India would put it in a place to have more meaningful conversations with sponsors to swell the money flow into the struggling Caribbean cricket 🏏
🔗: https://t.co/Tes7kMEYIr | 📸: K. Murali Kumar
#WestIndies #cricket
— Sportstar (@sportstarweb) October 18, 2026
दोन्ही देशांतील क्रिकेट संस्कृती आणि सुविधांमधील फरक स्पष्ट करताना सॅमी म्हणाला की, “भारतीय संघ जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा त्यांच्याकडून विश्वचषक जिंकण्याचीच अपेक्षा असते, कारण त्यांनी खेळाडूंसाठी सर्वोत्तम व्यवस्था उभी केली आहे. याउलट वेस्ट इंडिजचा संघ जेव्हा खेळायला जातो, तेव्हा त्यांना अनेक अडचणींवर मात करत कामगिरी करावी लागते. एका बाजूला सर्व सुविधा उपलब्ध आहेत, तर दुसऱ्या बाजूला आम्हाला संघर्षातून पुढे जावे लागते.”
अडचणींवर मात करत पुढे जाण्याचा निर्धार –
सर्व प्रतिकूल परिस्थिती असतानाही कॅरेबियन खेळाडूंनी हार मानलेली नाही, असे सॅमीने अधोरेखित केले. आर्थिक चणचण आणि सुविधांचा अभाव असतानाही संघाने दाखवलेली जिद्द ही त्यांच्या प्रगतीची नांदी आहे. या दौऱ्यातील कामगिरीने विंडीज क्रिकेटने एक मोठे पाऊल पुढे टाकल्याचे सांगत, भविष्यात योग्य मदत मिळाल्यास हा संघ पुन्हा गतवैभव प्राप्त करू शकेल असा ठाम विश्वास त्याने शेवटी व्यक्त केला.





