Mahavatar Narasimha : विदेशातही डंका! अॅनिमेटेड सिनेमाने रचला इतिहास; कमाई १०० कोटींच्या पार… तुम्ही पाहिलात का?

Mahavatar Narasimha : अश्विन कुमारचा अॅनिमेटेड सिनेमा महावतार नसरिम्हा बॅाक्स अॅाफिसवर धूमाकूळ घालत आहे. एका अनिमेटड सिनेमाने नवा इतिहास रचत अनेक रेकॅार्ड मोडले आहेत. चार कोटींमध्ये बनविलेल्या या सिनेमाने १०० कोटींची भरगच्च कमाई केली आहे. देशभरात या सिनेमाने अशरक्षा: वेडं लावलं असून, आता या सिनेमाने विदेशातही आपल्या नावाचा डंका केला आहे. त्यामुळे आगामी काळात हा सिनेमा अनेक रेकॅार्ड ब्रेक करेल, असे सांगितले जात आहे.
या सिनेमाने अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार 2‘ या सिनेमाला मागे टाकले आहे आणि ‘सैयारा‘च्या कलेक्शनवरही मोठा परिणाम या सिनेमामुळे होत आहे. महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्सचा पहिला सिनेमा असून यामध्ये हिरण्यकश्यप आणि त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद यांच्या भगवान विष्णूवरील निःस्वार्थ प्रेम आणि भक्तीची कहाणी सांगणारा आहे. भारतात हा सिनेमा २५ जुलै रोजी प्रदर्शित झाला.
पहिल्या दिवशीची जर आकडेवारी या सिनेमाची पाहिली तर केवळ १.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने २३.१ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. यानंतर, सिनेमात आठवड्याच्या दिवशी अनुक्रमे ७.३५ कोटी आणि ७.७५ कोटी रुपये कमावले. हा सिनेमा इतर भाषांमधील हिंदी आणि तेलुगूमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आहे. या सिनेमाने देशभरात आतापर्यंत एकूण ११२ कोटी रुपयांचे बॅाक्स अॅाफिस कलेक्शन केलं आहे.
लवकरच १५० कोटी
जगभरातील कमाईच्या बाबतीत हा सिनेमा मागे नाही. सॅकसिंल्कच्या मते, सिनेमाचे कलेक्शन १४० कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे कमाईचा आकडा १५० कोटी रुपयांच्या कमाईच्या जवळ पोहोचला आहे.
हेही वाचा : “शेतकऱ्यांपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही” ; डोनाल्ड ट्रम्पचे नाव न घेता टॅरिफवर पंतप्रधानांचे थेट उत्तर





