Satara : कोयनेत धरणग्रस्तांनी केली होळी; शासनाच्या नावाने बोंबा मारुन केला निषेध

कोयनानगर (प्रतिनिधी)- कोयनानगर (ता. पाटण) येथे गत ८ दिवसापासून आपल्या न्याय मागण्यांसाठी सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाकडे शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आज आंदोलनस्थळी होळी पेटवून शासनाच्या नावाने शिमगा करून शासनाच्या नावाने बोंबा मारून निषेध व्यक्त केला.
कोयनानगर येथे प्रकल्पग्रस्तांचे विविध मागण्यांवर श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवड्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री, पालकमंत्री जिल्ह्याचे सुपुत्र असूनसुद्धा त्यांना धरणग्रस्तांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वेळ मिळत नाही, हे जनतेचे सरकार आहे हे नेहमी म्हणणारे कोयनेचे सुपुत्र असलेले मुख्यमंत्री धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर गंभीर दिसत नाहीत, इतर विषयांबाबत बैठकीसाठी वेळ आहे, मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सरकार स्थापनेपासून गेले आठ महिने त्यांना वेळ मिळाला नाही. त्यांच्या दिरंगाईमुळे आज आम्हा धरणग्रस्तांना गेल्या आठ दिवसांपासून उन, वारा, थंडीची तमा न बाळगता घरादाराची पर्वा न करता याठिकाणी आंदोलनास बसावे लागले, येणारे सणवारही आंदोलनस्थळी साजरे करावे लागत आहेत, असा आरोप आंदोलक धरणग्रस्तांनी करून आज सोमवारी आंदोलनाच्या आठव्या दिवशी डॉ. भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होळी आंदोलन करून प्रकल्पग्रस्त आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या दिरंगाईच्या विरोधात जोरदार घोषणा, बोंबा देऊन होळी साजरी केली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/mhada-will-act-as-an-agency-for-workers-gharkul-schemes-labor-minister-dr-suresh-khade/
प्रकल्पग्रस्तांनी राज्याच्या विकासासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेऊन सर्वस्वाचा त्याग केला. त्यांच्या घरी होळीचा सण साजरा न होता आंदोलनस्थळी होळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला . तरी शासनाला सुबुध्दी येवो व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागोत. यावेळी कोयना धरण ग्रस्त व अभयारण्य ग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लागले पाहिजेत, धरणग्रस्तांना उद्वस्त करणारा शासन निर्णय दुरूस्त झाले पाहिजेत. शंभर टक्के विकसनशील पुर्नवसन झाले पाहिजे, अशा मागण्या करण्यात आल्या.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/happy-holi-dhulivandan-from-chief-minister-eknath-shinde/
आंदोलकांनी परंपरागत होळी सण आंदोलनस्थळी साजरा केला, यावेळी कोयना, वांग मराठवाडी, उरमोडी, तारळी प्रकल्पग्रस्त जनता हजारोंच्या संख्येने होळी आंदोलनात सहभागी झाली.





