Daisy Shah: घराजवळ आग लागल्यानंतर अभिनेत्री संतापली, म्हणाली… काही ‘बेवकूफ’ लोकांमुळे प्रकार घडला

Daisy Shah: बॉलीवूड अभिनेत्री डेजी शाह हिने मंगळवारी सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या घराजवळील इमारतीला आग लागल्याची घटना सांगितली असून, या प्रकारामागे फटाके फोडणाऱ्या लोकांची गैरजबाबदारी असल्याचा आरोप केला आहे.
ही घटना मुंबईतील बांद्रा ईस्ट परिसरात घडली. मंगळवारी रात्री डेजी शाह तिच्या पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर गेली असताना शेजारच्या इमारतीत अचानक आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग निवडणूक प्रचारादरम्यान फटाके फोडल्यामुळे लागली.
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर
डेजी शाहने हा संपूर्ण प्रकार इन्स्टाग्रामवर व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला. तिने फटाके फोडणाऱ्या लोकांवर संताप व्यक्त केला आणि लोकांमध्ये सिव्हिक सेन्सचा अभाव असल्याचं म्हटलं. व्हिडीओमध्ये डेजी म्हणते, “इलेक्शनमुळे इथे लोक आले आहेत, रस्त्यावर फटाके फोडत आहेत आणि त्याच्यामुळे इथे आग लागली.”
View this post on Instagram
जबाबदार लोक पळून गेल्याचा आरोप
डेजीने सांगितलं की, आग लागल्यानंतर या घटनेस जबाबदार असलेले लोक तिथून पळून गेले आणि स्थानिक रहिवाशांनाच या संकटाला सामोरं जावं लागलं.
पब्लिक सेफ्टीवर व्यक्त केला संताप
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये डेजी शाहने निवडणूक प्रचार करणाऱ्या टीम्सवर थेट टीका केली. ती म्हणाली, “माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. पण जेव्हा प्रचारासाठी टीम्स नेमल्या जातात, तेव्हा त्यांच्यात थोडी तरी जबाबदारी आणि समज असावी.”
रहिवासी भागात फटाके फोडण्यावर नाराजी व्यक्त करत ती पुढे म्हणाली, “ही काही नैसर्गिक आपत्ती नाही. हा प्रकार काही बेवकूफ लोकांमुळे झाला आहे. आता तरी जबाबदारी घ्या, खूप झालं.”
डेजी शाहच्या या व्हिडीओनंतर पब्लिक सेफ्टी आणि निवडणूक प्रचारातील गोंगाटावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.





