Fire Breaks Out: राजस्थानच्या भिवाडीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग; ७ कामगारांचा होरपळून मृत्यू
Fire Breaks Out: राजस्थानमधील भिवाडी येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भिवाडी याठिकाणी एका केमिकल फॅक्टरीत आग भीषण लागली, ज्यामध्ये किमान सात कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Fire Breaks Out: राजस्थानमधील भिवाडी येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भिवाडी याठिकाणी एका केमिकल फॅक्टरीत आग भीषण लागली, ज्यामध्ये किमान सात कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, परंतु दोन कामगार अजूनही आत अडकले आहेत. घटनेच्या वेळी सुमारे २५ कामगार काम करत होते. सोमवारी सकाळी ९:३० च्या सुमारास खुसखेडा करौली औद्योगिक क्षेत्रात हा अपघात घडला.
एडीएम सुमिता मिश्रा यांनी यांनी माहिती देताना, परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आणि घटनास्थळी तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. कारखान्यात रसायने आणि फटाके बनवले जात होते. कारखान्याच्या मालकाचे नाव राजेंद्र आहे. Fire Breaks Out:
त्यांनी सांगितले की, खुसखेडा आणि भिवाडी रिको अग्निशमन केंद्रातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
मृतदेह गंभीरपणे जळाले होते, फक्त अनेकांचे सांगाडे शिल्लक राहिले. शरीराचे तुकडे विखुरलेले आढळले. बचाव पथकाने प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये हे तुकडे गोळा केले.
तिजाराचे डीएसपी शिवराज सिंह घटनास्थळी उपस्थित आहेत. त्यांनी तपास सुरू केला आहे. भिवाडीचे एसपी आणि एडीएम लवकरच घटनास्थळी पोहोचतील अशी अपेक्षा आहे. Fire Breaks Out:






