मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच दादासाहेब खिंडकर पोलिसांना शरण; नेमकं काय घडलं?

Beed Crime News | सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. या व्हिडिओमध्ये दादा खिंडकर तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. खिंडकर हे धनंजय देशमुख यांचे साडू आहेत. त्यामुळे त्यांचीही गुंडगिरी बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणानंतर आज सकाळी दादा खिंडकर पोलिसांना शरण आला. त्याला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यापूर्वी हा व्हिडीओ जुना असल्याचं दादा खिंडकरने सांगितलं होतं आणि प्रकरण मिटल्याचंही सांगितलं होतं. Beed Crime News |
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाचे नाव ओमकार सातपुते असे आहे. त्याने एक व्हिडीओ केला होता. त्याचाच राग मनात धरून दादा खिंडकर आणि त्याच्या साथीदारांनी सातपुते याचे अपहरण करून शेतात नेले आणि त्याला बेल्ट, वायर, पाइप, काठीने बेदम मारहाण करण्यात आली. Beed Crime News |
दादा खिंडकरविरोधात अनेक गुन्हे दाखल
दादा खिंडकर यांच्याविरोधातही तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये पिंपळनेर पोलिस ठाण्यात सहा, बीडमधील शिवाजीनगर ठाणे चार आणि पेठबीड ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर नागपूर येथे तरुणांना नोकरी लावतो म्हणून पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, रस्त्यात अडवून लुट करणे अशा गुन्ह्यांचा यात समावेश आहे.
बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावचा सरपंच दादासाहेब खिंडकर असून त्याचे मागच्या 10 वर्षांपासून ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक वाद आणि भांडण समोर आले होती.
दरम्यान, गेल्या काही माहिन्यांपुर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणापासून बीड सातत्यान चर्चेत आहे. अशातच बीडमधील राजकीय नेत्यांच्या निकटवर्तींयाचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ, ऑडीओ क्लीप यामुळे बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिस देखील अॅक्शन मोडवर आलेले आहेत.
हेही वाचा:
होळी खेळताना पाण्यापासून फोन कसा ठेवाल सुरक्षित? डिव्हाइसच्या सुरक्षेसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स





