Jai Pawar post : “Dad माझा प्रत्येक काळ….”; जय पवार यांची वडिलांसाठी आणखी एक भावूक पोस्ट
Jai Pawar post : अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी आणखी एक भावूक पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केली आहे.
Updated On:

Jai Pawar post : अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंब या दुःखातून अद्यापही सावरलेले नाही. विमान अपघातात अजित पवार यांना गमावल्यानंतर पवार कुटुंबात एक मोठी मोकळी निर्माण झाली आहे. राज्यातील विविध ठिकाणाहून बारामती येथे नेत्यांकडून पवार कुटुंबाची भेट घेत अजित पवार यांच्या स्मृतीस अभिवानदन केले जात आहे.
नुकतीच अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर वडिलांप्रती एक भावुक पोस्ट केली होती. आता पुन्हा एकदा अजून एक पोस्ट जय पवार (Jai Pawar post) यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. काल शरद पवार अजित पवार यांच्या घरी गेले होते. यावेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह कुटुंबातील काही सदस्य उपस्थित होते. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ सुनेत्रा पवार यांनी घेतल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात भेट झाली.
पोस्टमध्ये काय म्हणाले जय पवार?
नुकतीच Dad काश वेळ थांबली असती..! मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो..! अशी पोस्ट जय पवार यांनी शेअर केली होती. अशातच अजून एक पोस्ट जय पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केली असून, या पोस्टमध्ये त्यांनी “Dad माझा प्रत्येक काळ, आज आणि येणारा प्रत्येक उद्या तुमचाच आहे. तुमची प्रचंड आठवण येते. तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील….” अशा शब्दांत जय पवार यांनी आपल्या वडिलांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या.
अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबातील रोहित पवार, युगेंद्र पवार सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अजित पवार त्यांचे काका होते. राजकारण एकाबाजूला आणि नाती आपल्या ठिकाणी अशीच शिकवण दोघांनीही अंगीकारली आहे. दोघांनाही अजित पवार यांच्या अकाली निधनाने अतीव दुःख झाले आहे.





