डॅड, लव्ह यू! सतीश शाहांना निरोप देताना अॅानस्क्रिन मुलगा भावुक; अभिनेता सुमित राघवनचा व्हिडीओ व्हायरल

Sumit Raghavan video : ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह हे आता हयात नाहीत, यावर अनेकांचा विश्वास अद्यापही बसलेला नाही. त्यांच्या सोबत काम केलेल्या अनेक कलाकर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अपूर्ण करत त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. आपल्या मिश्किल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेते सतीश शाह काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
आज त्यांना अखेरचा निरोप दिला जात आहे. अशातच सोशल मीडियाच्या माध्यमातून सतीश शाह यांच्या अॅानस्क्रिन मुलाने त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अभिनेता अत्यंत भावूक झाला होता. त्याला गहिवरून आले होते. डोळ्यातून दुःखद अश्रू आले.
मराठमोळा अभिनेता सुमित राघवनेने त्याच्या इंन्स्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने साराभाई व्हर्सेस साराभाई मालिकेतील कर्ता पुरुष हरपल्याची भावना व्यक्त केली. यावेळी त्याला अश्रू अनावर झाले होते. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मालिकेत ‘इंद्रवदन साराभाई’ ही भूमिका सतीश शाह यांनी साकारलेली होती. याच मालिकेत अभिनेता सुमित राघवन याने त्यांच्या मुलाची भूमिका साकारलेली होती.
“२००४ मध्ये आम्ही एक मालिका सुरू केली, जी १७ भागांनंतर बंद झाली. पण आज लोकांना हा कार्यक्रम आपलासा वाटतो. अनेकजण आम्हाला आमच्या भूमिकांच्या नावाने ओळखतात. लोक सांगतात की, मी आमच्या घरातला ‘साहिल’ आहे, किंवा तो ‘रोशेष’ आहे. मात्र, कोणीही कधी ‘हा आमच्या घरातला इंद्रवदन आहे’ असं म्हटलं नाही. कारण इंद्रवदन एकच होता! तो म्हणजे आमचे सतीश काका.” असे सुमितने सांगितले.
View this post on Instagram
आम्ही जेव्हा भेटायचो, तेव्हा सतीश, सुमित म्हणून नाही, तर साहिल, डॅड, मॉम याच नात्याने भेटायचो, अशी आठवणही सुमितने व्हिडीओत सांगितली आहे. आज साराभाई कुटुंबातील सर्वात वयस्कर सदस्य आणि कर्ता पुरुष आम्हाला सोडून गेला आहे, असे व्हिडीओत जड अंत:करणाने सुमीतने आपल्या अॅानस्क्रिन वडिलांना निरोप देताना म्हटले आहे.
“मी डॅडला एवढंच सांगेन की, तुमचा प्रवास सुरक्षित असो. दुसऱ्या बाजूला आपण लवकरच भेटू… खूप सारं प्रेम.” असे तो म्हणाला. तसेच “सतीश काका, आम्हाला तुमची फार आठवण येईल. डॅड, लव्ह यू, वी ऑल लव्ह यू इंदू, नारदमुनी…” असे कॅप्शन त्याने व्हिडीओला दिले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा : एकनाथ शिंदेंच्या दिल्लीतील भेटीगाठी केव्हा वाढतात? संजय राऊतांनी सांगितलं कारण; ‘हा’ मोठा दावा करत म्हणाले…





