सायरस मिस्त्रींची हकालपट्टी बेकायदेशीर

दिल्ली : सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या चेअरमनपदी पुन्हा एकदा नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 3 वर्षांपूर्वी सायरस मिस्त्री यांची या पदावरून हकालपट्टी झाली होती. त्याविरोधात त्यांनी राष्ट्रीय कंपनी लवादात याचिका दाखल केली होती. लवादाने सायरस मिस्री यांना हटवण्याचा निर्णय बेकायदेशीर ठरवला असून, एन. चंद्रशेखरन यांची झालेली नियुक्तीही कोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे.
राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाने सायरस मिस्त्री यांची टाटा कंपनीच्या चेअरमन पदावरून केलेली हकालपट्टी बेकायदेशीर ठरवली आहे. टाटा सन्समध्ये सायरस मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे.
National Company Law Appellate Tribunal(NCLAT) allows the plea of Cyrus Mistry and reinstated him as Chairman of Tata Sons. NCLAT set aside the board order of October 24(2017) which had removed Mistry as Chairman. NCLAT also said that Mistry's removal was illegal. (file pic) pic.twitter.com/to8UNVsEmI
— ANI (@ANI) December 18, 2019
राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाने मिस्त्री यांची हकालपट्टी बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला.रतन टाटा यांच्या निवृत्तीनंतर चेअरमन झालेले सायरस मिस्त्री यांनी 2012 ते 2016 अशी 4 वर्षं कार्यभार सांभाळला होता .





