Cyclone Michaung : येत्या ४८ तासांत बंगालच्या उपसागरात ‘मायचॉन्ग’ चक्रीवादळ धडकणार ;हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Cyclone Michaung : बंगालच्या आग्नेय उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्णपणे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज यासंदर्भात इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरातील हवामानात कोणते बदल होणार आहेत, ते वादळात रूपांतरित होणार असल्याचीही माहिती यात देण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने याविषयी माहिती देताना, ज्या प्रकारची हवामान परिस्थिती निर्माण झाली आहे, ती पश्चिम-वायव्य दिशेकडे जाण्याचा अंदाज आहे. ही हवामान परिस्थिती 30 नोव्हेंबरपर्यंत बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील खोल दबावात हळूहळू विकसित होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतरित होईल. त्यानंतर येत्या 48 तासांत ते नैऋत्य आणि लगतच्या दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरावर ‘मायचॉन्ग’ चक्रीवादळात रूपांतरित होईल, असा अंदाज आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, हवामान विभागाने असेही म्हटले आहे की निकोबार बेटांवर बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान, निकोबार बेटांवर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. अंदमान बेटांमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 नोव्हेंबरलाही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
हवामान विभागानुसार, ताशी 25-35 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहतील, जे ताशी 45 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. हे वारे 29 नोव्हेंबर रोजी म्हणजे आज दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या अंदमान आणि निकोबार बेटांवर वाहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या आग्नेय दिशेला 30 नोव्हेंबर रोजी ताशी 40-50 किमी ते 60 किमी प्रतितास या वेगाने वारे वाहू शकतात. 1 डिसेंबरपर्यंत या वाऱ्यांचा वेग ताशी 50-60 किलोमीटरवरून ताशी 70 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 2 डिसेंबर रोजी हे वारे ताशी 60-70 किलोमीटर वेगाने 80 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतात.





