Rain Update : महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा; IMD चा ताजा अंदाज काय?
Rain Update : बंगालच्या उपसागराच्या पूर्व-मध्य भागात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र (Low-Pressure Area) वेगाने तीव्र होत असून, येत्या २६ ऑक्टोबरपर्यंत त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची दाट शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

Rain Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) २४ ऑक्टोबरच्या अंदाजानुसार, ही प्रणाली अधिक तीव्र होऊन २६ ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. (Rain Update)
या हवामान प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवरही होण्याची शक्यता आहे. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे चित्र सध्या दिसत नाही. (Rain Update)
बंगालच्या उपसागरात नेमकं काय घडतंय?
बंगालच्या उपसागराच्या पूर्व-मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र अधिक ठळक झाले आहे. त्याची तीव्रता वाढून २५ ऑक्टोबरला खोल दाबक्षेत्र आणि २६ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. ही प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने सरकत २८ ऑक्टोबरच्या आसपास आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचू शकते. (Rain Update)
या प्रणालीमुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशासह काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, तिच्या पुढील वाटचालीवर पावसाचे स्थान आणि तीव्रता अवलंबून असेल. (Rain Update)
महाराष्ट्रात कुठे पाऊस पडू शकतो?
IMD च्या उपविभागनिहाय अंदाजानुसार, विदर्भात २७ ऑक्टोबरला काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. २८ ऑक्टोबरला काही ठिकाणी अतिवृष्टी, तर २९ ऑक्टोबरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Rain Update)
महाराष्ट्राबाहेर कोणत्या राज्यांना पावसाचा इशारा?
बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच छत्तीसगड, तेलंगणा आणि इतर काही भागांतही पावसाचा प्रभाव जाणवू शकतो. समुद्रावरील वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीवरील भागांसाठी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. (Rain Update)
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात ऑक्टोबरअखेर पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज




