Russia-Ukraine Cyberattack : रशिया-युक्रेनमध्ये सायबर हल्ला.! मोबाइलवर आपत्कालिन सतर्कतेचा बनावट अलर्ट
युक्रेनप्रमाणेच रशियामध्येही सावधगिरीचे बनावट अलर्ट वापरकर्त्यांच्या मोबाइलवर पाठवले गेले होते. रशियाच्या आपत्कालिन मंत्रालयाच्या मोबाइल ॲपशी संपर्क प्रस्थापित करून हा सायबर हल्ला केला गेला होता.

Russia-Ukraine Cyberattack – रशिया आणि युक्रेनमधील नागरिकांच्या मोबाइल ऍपवर आपत्कालिन सतर्कतेचा खोटा अलर्ट पसरल्यामुळे या दोन्ही देशांनी रविवारी रात्री सायबर हल्ला झाल्याचा दावा केला आहे. काही अनोळखी व्यक्तींनी हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणाऱ्या ऍपमध्ये छेडाछेडी सांगून ही सेवा तात्पुरत्या काळासाठी स्थगित केल्याचे सांगितले.
या ऍपद्वारे मिळणाऱ्या संशयास्पद नोटिफिकेशन लिंकवर क्लिक करू नये, अशी सूचनाही वापरकर्त्यांना देण्यात आली होती. रशियाच्या दररोज होणाऱ्या हवाई हल्ल्यांची पूर्वसूचना देणारे हे ऍप पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आल्याचे युक्रेनमधील प्रशासनाने रात्री उशीरा जाहीर केले. हा सायबर हल्ला हिटकोर या गटाने केल्याचे एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
या गटाच्या प्रवक्त्याने याबाबतची जबाबदारी स्वीकारल्याचे रशियातल्या टेलिग्रामवरच्या एका चॅनेलने म्हटले आहे. या सायबर हल्ल्याचा युक्रेनच्या सुरक्षा आणि संरक्षण कार्यांवर कोणताही परिणाम झाला नाही, कारण हे ॲप लष्करी कमांड प्रणालीपासून वेगळे असल्याचे स्पष्टिकरण युक्रेनच्या हवाईदलाच्या कमांडने दिले आहे.
युक्रेनप्रमाणेच रशियामध्येही सावधगिरीचे बनावट अलर्ट वापरकर्त्यांच्या मोबाइलवर पाठवले गेले होते. रशियाच्या आपत्कालिन मंत्रालयाच्या मोबाइल ॲपशी संपर्क प्रस्थापित करून हा सायबर हल्ला केला गेला होता, असे हा सायबर हल्ला कोणी केला होता, याबाबत मंत्रालयाने कोणताही खुलासा केला नाही. पण ही प्रणाली सामान्यपणे काम करत असून मोबाइल ॲप पर्यायी व्यवस्थेच्या आधारे काम करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
खेरसोन भागातील मर्यादित युद्धविराम समाप्त
युक्रेनच्या खेरसोन भागातील मर्यादित युद्धविराम समाप्त झाल्यानंतर रशियाने या भागात ड्रोन हल्ला केला. रशियाने ताबा घेतलेल्या प्रदेशापासून निप्रो नदीच्या पलीकडे असलेल्या खेरसॉन शहरात ड्रोनमुळे झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या ६२ वर्षीय महिला आणि ७३ वर्षीय पुरुषाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सोमवारी पहाटे मध्यरात्री स्थानिक युद्धविरामाची मुदत समाप्त झाली. या युद्धातील हा अल्पकालीन विराम रशियाच्या ताब्यातील ओलेश्की शहरात मानवतावादी मदत पोचवण्यासाठी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्या पुढाकाराने करण्यात आला होता.





