#CWG2022 #Weightlifting : रौप्य पदकविजेता ‘संकेत’ला राज्य सरकारकडून 30 लाखांचे पारितोषिक जाहीर

मुंबई – इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022 ) सांगलीच्या संकेत महादेव सरगर यांने वेटलिफ्टिंगमध्ये पुरूषांच्या 55 किलो गटात शनिवारी रौप्यपदक पटकावले आहे. संकेत सरगरने स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये एकूण 248 किलो वजन उचलून रुपेरी कामगिरी केली.
बर्मिंगहममधील या स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक आहे. या कामगिरीच दखल घेत राज्य सरकारने संकेत सरगरला तीस लाखांचे पारितोषिक जाहीर केले आहे. तसेच त्याच्या मार्गदर्शकांनाही साडेसात लाखांचे पारितोषिक देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला शासनाकडून तीस लाखांचे तर त्याच्या मार्गदर्शकांना साडेसात लाखांचे पारितोषिक जाहीर – मुख्यमंत्री @mieknathshinde यांची घोषणा#CWG2022#B2022 pic.twitter.com/0Z2JotvIJY
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 31, 2022
संकेत हा हिंदकेसरी कै. मारूती माने यांच्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणारा सांगलीतील दुसरा खेळाडू आहे. 1970 साली कै. मारूती माने यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. आज तब्बल 52 वर्षाने सांगलीच्या खेळाडूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपर्यंत रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे.





