#CWG2022 #Weightlifting : पूनम यादवचे पदक हुकले, रेफरीच्या इशाऱ्यापूर्वीच तिने…

बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मंगळवारी पाचव्या दिवशी भारताची स्टार महिला वेटलिफ्टर पूनम यादव हिला महिलांच्या 76 किलो वजनी गटात पदकाने हुलकावणी दिली. तिने स्नॅचमध्ये 98 किलो वजन उचलले. मात्र, क्लीन अँड जर्क मध्ये तिला निकषानूसार एकदाही 116 किलो वजन उचलता आले नाही व पदकापासून वंचित राहावे लागले.
2018 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पूनमने सुवर्णपदक जिंकले होते, त्यामुळे या स्पर्धेतही तीच्याकडून अशाच कामगिरीची पुनरावृत्ती होइल अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली.
क्लीन अँड जर्कच्या तिसऱ्या प्रयत्नात पूनमने वजन उचलले. परंतू, रेफरीच्या इशाऱ्यापूर्वीच तिने बारबेल खाली ठेवली व तीचा हा प्रयत्न फोल ठरला.
यावेळी भारतीय संघाने रेफ्रींच्या निर्णयाला आव्हानही दिले होते मात्र, ज्युरींनी ते फेटाळून लावले. भारताच्या एम श्रीशंकरने लांब उडी प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. त्याने पात्रता फेरीत 8.05 मीटर उडी मारली.





