#CWC23 #SAvAFG | अजमतुल्लाहचं शतक हुकले; अफगाणिस्तानचं दक्षिण आफ्रिकेसमोर 245 धावांचे लक्ष्य…

World Cup 2023 South Africa vs Afghanistan Match : विश्वचषक 2023 च्या 42व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना अफगाणिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मात्र, गेल्या सामन्यात भारताविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अशा स्थितीत संघ पुन्हा गती मिळविण्याचा प्रयत्न करेल.
त्याचवेळी अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर नसला तरी Semifinal मध्ये पोहचण्यासाठी त्यांच्यासाठी समीकरणे खूपच कठीण आहेत. अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 438 किंवा त्याहून अधिक धावांनी विजय मिळवावा लागेल.
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सर्व गडी गमावून 244 धावा केल्या. अजमतुल्लाह उमरझाईने 107 चेंडूत 7 चौकार अन् 3 षटकारासह सर्वाधिक 97 धावा केल्या. रहमत शाह आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी 26 धावांचे योगदान दिले. रहमानउल्ला गुरबाजने 25 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. लुंगी एनगिडी आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. फेहलुकवायोने एक विकेट घेतली.
TARGET SET! 🎯@AzmatOmarzay scored an incredible 97* (107) to power #AfghanAtalan to 244/10 in the first inning. @Noor_Ahmad_15 (26) and @RahmatShah_08 (26) were the other batters contributing to the total. 👏
Over to our bowlers now…! 👍#CWC23 | #AFGvSA | #WarzaMaidanGata pic.twitter.com/ksmMht5yxy
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 10, 2023
दोन्ही संघांसाठी हा सामना फारसा महत्त्वाचा नाही. दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानसाठी उपांत्य फेरीचे दरवाजे बंद झाले आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी या संघाला हा सामना 438 धावांनी जिंकावा लागणार होता, मात्र या संघाला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
तत्पूर्वी, अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने दोन बदल केले आहेत. मार्को जॅनसेन आणि तबरेझ शम्सी यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी जेराल्ड कोएत्झी आणि अँडिले फेहलुकवायो यांना संधी देण्यात आली आहे.
SA vs AFG : दोन्ही संघाचं Playing 11 पुढीलप्रमाणे…
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, जेराल्ड कोएत्झी.
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम जद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, इकराम अलीखिल, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक.





