#CWC23 #NEDvBAN : बांगलादेशला सहावा धक्का..! नेदरलँड्सची वाटचाल आणखी एका उलटफेरकडे….

World Cup 2023 BAN vs NED Match Live Score Updates : विश्वचषकाच्या 28व्या सामन्यात बांगलादेशसमोर नेदरलँड्सचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. कोलकातामध्ये खेळल्या जाणार्या या विश्वचषकातील हा पहिलाच सामना आहे. नेदरलँड्स चा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर नेदरलँड्सचा संघ 50 षटकांत सर्वबाद 229 धावसंख्येपर्यतच मजल मारू शकला. आता बांगलादेशला विजयासाठी 230 धावा करायच्या आहेत.
हा सामना गमावणारा संघ विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. बांगलादेश आणि नेदरलँड्ससाठी उपांत्य फेरी गाठण्याचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. आता अंतिम चारमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांना प्रत्येक सामना जिंकावा लागेल. यासोबतच दोन्ही संघांना इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे.
NED vs BAN Live Score: बांगलादेश संघ अडचणीत
विजयासाठी 230 धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघ अडचणीत आला आहे. त्यांचे सहा फलंदाज बाद झाले आहेत. बांगलादेशला सहावा धक्का मुशफिकुर रहीमच्या रूपाने बसला. हा अनुभवी फलंदाज पाच चेंडूत एक धाव काढून बाद झाला. 18व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मीकरेनने रहीमला क्लीन बोल्ड केले. बांगलादेशने 19 षटकांत 6 गडी गमावून 76 धावा केल्या आहेत. महमुदुल्लाहसोबत महेदी हसन क्रीजवर आहे. बांगलादेश संघाला विजयासाठी 31 षटकात अजूनही 159 धावा करायच्या आहेत. यासह नेदरलँड्स संघाची वाटचाल आणखी एका उलटफेरकडे होत आहे.
बांगलादेशला शाकिब अल हसनच्या रूपाने मोठा धक्का बसला. 16व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो मीकरेनचा बळी ठरला. शाकिबने 14 चेंडूत पाच धावा केल्या. मीकरेनच्या चेंडूवर तो स्कॉट एडवर्ड्सकरवी झेलबाद झाला. शाकिबपाठोपाठ मेहदी हसन मिराजही पॅव्हेलियनमध्ये परतला. मेहदीला बास डी लीडेने स्कॉट एडवर्ड्सच्या हाती झेलबाद केले. त्याने 40 चेंडूत 35 धावा केल्या.
बांगलादेशला तिसरा धक्का, शांतो पुन्हा अपयशी…
बांगलादेशला तिसरा धक्का 11.5 षटकात 45 धावांवर बसला. बांगलादेशचा डावखुरा फलंदाज नजमुल हुसेन शांतो पुन्हा अपयशी ठरला आहे. विश्वचषकाच्या या आवृत्तीतही त्याची खराब कामगिरी कायम आहे. शांतो 18 चेंडूंत नऊ धावा करून बाद झाला. त्याला पॉल व्हॅन मीकेरेनने लॉग व्हॅन बीकच्या हाती झेलबाद केले.
19 धावसंख्येवर लागोपाठ दोन धक्के
बांगलादेशला 19 धावसंख्येवर लागोपाठ दोन धक्के बसले. बांगलादेशने 5.2 षटकात दुसरी विकेट आणि 4.2 षटकात पहिली विकेट गमावली. लोगान व्हॅन बीकने नेदरलँड्सला दुसरे यश मिळवून दिले. त्याने तनजीद हसनला स्कॉट एडवर्ड्सकरवी झेलबाद केले. तनजीदने 16 चेंडूत 15 धावा केल्या. तर त्याआधी आर्यन दत्त याने नेदरलँड्सला पहिले यश मिळवून दिले. लिटन दासची बॅट नेदरलँडविरुद्ध चालली नाही. पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. आर्यन दत्तने त्याला स्कॉट एडवर्डसकरवी झेलबाद करत पॅव्हेलियनमध्ये पाठवले. लिटन दासला 12 चेंडूत केवळ तीनच धावा करता आल्या.
#CWC23 #NEDvBAN : बांगलादेशच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, नेदरलँड्सचा संघ 229 धावांवर गारद..
तत्पूर्वी, नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर नेदरलँड्सचा संघ 50 षटकांत सर्वबाद 229 धावसंख्येपर्यतच मजल मारू शकला. नेदरलँड्सकडून फलंदाजीत कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 89 चेंडूत 68 धावा केल्या. त्यांच्याशिवाय वेस्ली बॅरेसीने 41 आणि सायब्रँडने 35 धावांचे योगदान दिले.
लोगान व्हॅन बीकने नाबाद 23, बास डी लीडेने 17 आणि कॉलिन अकरमनने 15 धावा केल्या. आर्यन दत्त नऊ, शरीझ अहमद सहा आणि विक्रमजीत सिंग तीन धावा करून बाद झाला. मॅक्स ओडाड आणि पॉल व्हॅन मीकरेन यांना खातेही उघडता आले नाही. बांगलादेशकडून शरीफुल इस्लाम, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि महेदी हसन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शकीब अल हसनला मात्र एक गडी बाद करता आला.





