\n

सध्याच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने पहिला विजय मिळवला आहे. लखनौमध्ये त्यांनी श्रीलंकेचा पाच विकेट्स राखून पराभव करून सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाला यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ सलग तिसऱ्या सामन्यात पराभूत झाला आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्ताननंतर आता ऑस्ट्रेलियानेही पराभव केला आहे.

\n

या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दोन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली. जोश इंग्लिशने सर्वाधिक 58 धावा केल्या. मिचेल मार्शने 52 धावांची खेळी केली. मार्शन लॅबुशेनने 40 धावा केल्या आणि इंग्लिशसोबत चौथ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. ग्लेन मॅक्सवेल 31 आणि मार्कस स्टॉइनिस 20 धावांवर नाबाद राहिला. डेव्हिड वॉर्नर 11 धावा करून बाद झाला. स्टीव्ह स्मिथला खातेही उघडता आले नाही. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने तीन बळी घेतले. दुनिथ वेलालगे याला एक गडी बाद करण्यात यश मिळाले.

\n
\n

Australia won by five wickets #CWC23 #SLvAUS pic.twitter.com/RxgVUTI7NS

\n

— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 16, 2023

\n

\n

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेचा डाव 43.3 षटकांत 209 धावांत गुंडाळला आहे. श्रीलंकेच्या संघाला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. कुसल परेरा आणि पथुम निसांका यांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी करून श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. निसांका 67 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार मारले. त्यांच्यानंतर परेरा 82 चेंडूत 78 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार मारले. हे दोघे बाद झाल्यानंतर लंकेचा संघ 209 धावांवर गडगडला. श्रीलंकेच्या 9 विकेट केवळ 84 धावांवर पडल्या.

\n

#CWC23 #AUSvSL : ऑस्ट्रेलिया-श्रीलंका सामन्यादरम्यान वादळाचा तडाखा! स्टेडियममधील प्रेक्षक थोडक्यात बचावले, पहा Video…

\n

\n

निसांका आणि मेंडिस व्यतिरिक्त फक्त चरित अस्लंकाला दुहेरी आकडा गाठता आला. त्याने 25 धावा केल्या. दासून शनाका बाद झाल्यानंतर कर्णधार असलेल्या कुसल मेंडिसला केवळ नऊ धावा करता आल्या. पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा सदीरा समरविक्रमा आठ धावांवर बाद झाला. धनंजय डी सिल्वा सात आणि लाहिरू कुमारा चार धावा करून बाद झाले. चमिका करुणारत्ने आणि दुनिथ वेललागे यांना प्रत्येकी दोनच धावा करता आल्या. महिशला तिक्षीना खाते उघडता आले नाही. तर, दिलशान मदुशंका खाते न उघडता नाबाद राहिला.

\n

#CWC23 #INDvBAN : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी Team India पुण्यात दाखल, पहा Video….

\n

\n

ऑस्ट्रेलियाकडून लेगस्पिनर अॅडम झाम्पाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. झाम्पाने 8.0 षटकात 47 धावा दिल्या. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. स्टार्कने 10 षटकात 43 तर कमिन्स यानं 7.0 षटकात 32 धावा दिल्या. ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेतली. त्यानं 9.3 षटकात 36 धावा दिल्या. जोश हेझलवूड यांन 7 षटकात 36 धावा दिल्या, त्याला एकही गडी बाद करता आला नाही.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#CWC23 #AUSvSL : ऑस्ट्रेलियानं विजयाचं खातं उघडलं, श्रीलंकेचा 5 विकेट्सने केला पराभव…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/Aus-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvsl-a-big-win-for-australia-with-nearly-15-overs-to-spare-making-it-their-first-victory-of-the-tournament#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/Aus-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvsl-a-big-win-for-australia-with-nearly-15-overs-to-spare-making-it-their-first-victory-of-the-tournament#webpage","name":"#CWC23 #AUSvSL : ऑस्ट्रेलियानं विजयाचं खातं उघडलं, श्रीलंकेचा 5 विकेट्सने केला पराभव…","url":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvsl-a-big-win-for-australia-with-nearly-15-overs-to-spare-making-it-their-first-victory-of-the-tournament","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvsl-a-big-win-for-australia-with-nearly-15-overs-to-spare-making-it-their-first-victory-of-the-tournament#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/Aus-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvsl-a-big-win-for-australia-with-nearly-15-overs-to-spare-making-it-their-first-victory-of-the-tournament#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvsl-a-big-win-for-australia-with-nearly-15-overs-to-spare-making-it-their-first-victory-of-the-tournament","name":"#CWC23 #AUSvSL : ऑस्ट्रेलियानं विजयाचं खातं उघडलं, श्रीलंकेचा 5 विकेट्सने केला पराभव…"}}]}}}

#CWC23 #AUSvSL : ऑस्ट्रेलियानं विजयाचं खातं उघडलं, श्रीलंकेचा 5 विकेट्सने केला पराभव…