#CWC23 #SAvAUS 2nd Semifinal : ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत, शम्सीने मॅक्सवेलला केलं क्लीनबोल्ड, सामना रंगतदार स्थितीत…

World Cup 2023 South Africa vs Australia 2nd Semi-Final :एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने बुधवारी न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली असून आज जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाशी होणार हे निश्चित होणार आहे.
SA vs AUS Live Score : ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 150
दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 213 धावांचा पाठलाग करताना सध्या 27 षटकांनंतर ऑस्ट्रेलियानं पाच गड्यांच्या मोबदल्यात 150 धावापर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज खूप दडपणाखाली असल्याचे दिसत आहे. फिरकीपटूंना खेळपट्टीची खूप मदत मिळत आहे. स्टीव्ह स्मिथ 44 चेंडूत 21 आणि जोश इंग्लिस 11 चेंडूत 06 धावांवर खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, मॅक्सवेल 1 धाव काढून बाद…
तबरेझ शम्सीने 24 व्या षटकात 137 धावांवर ग्लेन मॅक्सवेलला क्लीनबोल्ड करून दक्षिण आफ्रिकेला सामन्यात परत आणले. मॅक्सवेल बाद झाल्यावर ईडन गार्डन्सवरील प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष केला. मॅक्सवेलला पाच चेंडूत केवळ एकच धाव करता आली.
⚪ BOWLED
Shamsi notches another wicket as a peach goes straight through the gate💪
🇦🇺 Australia are 137/5 after 23.4 Overs #SAvAus #CWC23 #BePartOfIt
— Proteas Men (@ProteasMenCSA) November 16, 2023
त्याआधी, ऑस्ट्रेलियाची चौथी विकेट 133 धावांवर पडली. तबरेझ शम्सीने मार्नस लॅबुशेनला बाद केले. लॅबुशेनने 31 चेंडूत 18 धावा केल्या. शम्सीने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट 107 धावांवर पडली. ट्रॅव्हिस हेड 48 चेंडूत 62 धावा करून बाद झाला. केशव महाराजने त्याला क्लीन बोल्ड केले.
ऑस्ट्रेलियन संघानंं 7.4 षटकात 61 धावांवर दुसरी विकेट गमावली. मिचेल मार्श खाते न उघडताच बाद झाला. कागिसो रबाडाच्या चेंडूवर डुसेनने अप्रतिम झेल घेत मार्शला झेलबाद केलं. ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट 60 धावांवर पडली. डेव्हिड वॉर्नर 18 चेंडूत 29 धावा करून बाद झाला. एडन मार्करामने त्याला क्लीन बोल्ड केले.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियानं गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अक्षरशा गुडघे टेकले. डेविड मिलरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणाचा सामना एकट्या डेविड मिलर याने केला. मिलरच्या झंझावती शतकी खेळीच्या बळावर आफ्रिकेनं 49.4 षटकात सर्वबाद 212 धावांपर्यंत मजल मारली .





