ICC Cricket World Cup 2023 Final IND vs AUS : विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या संपूर्ण विश्वचषकात भारताने चमकदार कामगिरी केली आहे आणि 10 पैकी 10 सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषकात खराब सुरुवात केली होती, परंतु उपांत्य फेरीच्या सामन्यापर्यंत त्यांनी आपला जुना फॉर्म दाखवण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीचा अंतिम सामना अपेक्षित आहे. पहिल्यांदा 2003 मध्ये झाली होती भारत-ऑस्ट्रेलिया फायनल मॅच…. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना भारतीय संघासाठी खूप खास असेल, कारण या सामन्यात टीम इंडिया 20 वर्ष जुन्या पराभवाचा बदला घेऊ शकते. खरे तर 2003 च्या विश्वचषकात टीम इंडियाची मोहीमही उत्कृष्ट होती. टीम इंडियाने जगातील अनेक संघांना एकामागून एक पराभूत करून फायनल गाठली होती, जिथे त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला होता. त्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा एकतर्फी 125 धावांनी पराभव केला आणि तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्याच मान मिळवला. #CWC2023 Final : एकदिवसीय विश्वचषकात भारत-ऑस्ट्रेलिया किती वेळा आले आमनेसामने; जाणून घ्या… कोणाचं राहिलंय पारडे जड.. 2003 विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाने 50 षटकात केवळ 2 गडी गमावून 359 धावा केल्या. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगने 140 धावांची नाबाद खेळी खेळली आणि सामनावीराचा किताबही पटकावला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेली टीम इंडिया 39.2 षटकात 234 धावा करत सर्वबाद झाली. भारताकडून वीरेंद्र सेहवागने सर्वाधिक (82) धावा केल्या. भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमने-सामने… आता हे दुस-यांदा घडत आहे की एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होत आहे. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियानेही आपले सर्व सामने एकतर्फी जिंकून अंतिम फेरी गाठली आणि त्याच पद्धतीने अंतिम सामना जिंकून विश्वविजेतेपद पटकावलं होतं. यावेळी 2023 च्या विश्वचषकातही भारताने त्याच शैलीत आपले सर्व सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे आणि जर भारत अंतिम सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी पराभव करून विश्वविजेता ठरला तर 20 वर्षापूर्वी झालेल्या पराभवाचा बदला पूर्ण होईल.