ग्राहकांनो…! सोने चांदी खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा ‘लेटेस्ट दर’

आज सोने- चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आलेआहे. सर्वत्र १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच दर ७२,२३० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ८४,५५० रुपये आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याच्या दरात ५०० ते १००० रुपयांच्या दरम्यान वाढ आणि घसरण दिसून येतेय, तर चांदीचे दरही २०० ते ४०० दरम्यान वाढे आहे.
सोन्याची किंमत
आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७२,२३० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ६६,२११ रुपये आहे.
चांदीची किंमत
१० ग्रॅम चांदीचे दर ८४६ रुपये आहे तर १ किलो चांदी ८४,५५० रुपयांनी विकली जात आहे. त्यामुळे आज गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोन्या-चांदीचे दरात वाढ झाल्याची दिसून आली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही या दरात चढ उतार झाले आहेत.
जाणून घ्या तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे ‘लेटेस्ट दर’
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,१२८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,१४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१२८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,१४० रुपये आहे.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१२८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,१४० रुपये इतका आहे.
नाशिक
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१२८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,१४० रुपये आहे.
gold and silver price today । सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.
gold and silver price today । हॉलमार्ककडे लक्ष द्या
सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट, नियम आणि नियमांनुसार चालते.





