CSK vs RCB : हेल्मेटवर चेंडू मारल्याचा विराटने घेतला बदला, VIDEO होतोय व्हायरल

CSK vs RCB Virat Kohli smashes six and four to Matheesa Pathirana Video Viral : आयपीएल २०२५ मधील ८ वा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना सीएसकेसमो १९७ धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान आरसीबीच्या डावाच्या ११ व्या षटकात अशी घटना घडली की, सर्वजण काही काळासाठी घाबरले. सीएसकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने विराट कोहलीच्या हेल्मेटवर एक वेगवान बाऊन्सर चेंडू मारला. त्यानंतर विराटनेही या गोष्टीचा चोख बदला घेतला ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कोहलीच्या हेल्मेटला लागला चेंडू –
या सामन्यात मथिशा पाथिरानाने १४२ किलोमीटर वेगाने टाककेला बाऊन्सर चेंडू विराट कोहलीच्या हेल्मेटवर आदळला. यानंतर कोहलीने चोख प्रत्युत्तर देताना एक षटकार आणि एक चौकार मारला. मथिशा पाथिरानाने ११ व्या षटकातील पहिला चेंडू बाउन्सर टाकला होता. ज्यावर कोहलीने हुक मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या हेल्मेटला आदळला.
फिजिओ दाखल झाले होते मैदानात –
VIRAT KOHLI HITS 6,4 vs PATHIRANA AFTER HIT ON HELMET.
– The GOAT. 🐐pic.twitter.com/LXVFWaKoKO
— Tanuj (@ImTanujSingh) March 28, 2025
आरसीबीचे फिजिओ आणि सपोर्ट स्टाफ लगेच मैदानात आले. त्यांनी कोहलीच्या डोक्याला दुखापत तर झाली नाही ना याची पाहणी केली. चांगली गोष्ट म्हणजे कोहलीने त्याला दुखापत झाली नसल्याचे सांगितले. त्याने खेळण्यासाठी तयार असल्याचे सांगण्यासाठी अंगठा दाखवून संकेत दिले. यानंतर कोहलीने शानदार पुनरागमन केले. पुढच्या दोन चेंडूंमध्ये त्याने आपली ताकद दाखवली. त्याने पहिल्याच चेंडूवर डीप स्क्वेअर लेगवर षटकार मारला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने डीप मिड-विकेटवर चौकार मारला. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
आरसीबीने सीएसकेसमोर ठेवले १९७ धावांचे लक्ष्य –
चेन्नईने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाटीदारने ३२ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या, ज्यामुळे आरसीबीला २० षटकांत सात बाद १९६ धावा करता आल्या. आरसीबीला १९० धावांचा टप्पा ओलांडून देण्यात रजत पाटीदार व्यतिरिक्त टिम डेव्हिडला जाते. त्याने शेवटच्या षटकात सॅम करन टाकण्यासाठी आलेल्या षटकात डेव्हिडने सलग तीन षटकार मारले आणि त्या षटकातून एकूण १९ धावा काढल्या. डेव्हिडने २२ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांसह २२ धावा काढत नाबाद राहिला.
तत्पूर्वी सॉल्ट आणि कोहलीच्या मदतीने आरसीबीने चांगली सुरुवात केली होती, परंतु सीएसकेने पुनरागमन केले. आरसीबीकडून सॉल्टने ३२ धावा, कोहलीने ३१ धावा, देवदत्त पडिक्कलने २७, जितेश शर्माने १२ आणि लियाम लिव्हिंगस्टोनने १० धावा केल्या. सीएसकेकडून फिरकी गोलंदाज नूर अहमदने सर्वाधिक तीन, मथिशा पाथिरानाने दोन आणि खलील अहमद आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





