CSK vs MI : दीपक चहरच्या खेळीच्या जोरावर मुंबईने उभारली सन्मानजनक धावसंख्या, चेन्नईला दिले ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य

CSK vs MI Mumbai Indians set a target of 156 runs for Chennai Super Kings : नूर आणि खलील यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने (CSK) मुंबई इंडियन्स (MI) ला १५५ धावांवर रोखले. आयपीएल २०२५ चा तिसरा सामना चेपॉक येथे खेळला जात आहे. या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, मुंबईने नऊ विकेट्स गमावून दीपक चहरने केलेल्या अंतिम टप्प्यातील फटकेबाजीच्या सीएसकेसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले.
मुंबईच्या फलंदाजांनी केली निराशा –
या सामन्यात मुंबईची परिस्थिती सुरुवातीपासूनच वाईट राहिली. कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला खलील अहमदने बाद केले. त्यानंतर खलीलने रायन रिकेलटन (१३) ला बाद केले. सीएसकेमध्ये परतल्यानंतर पहिला सामना खेळणारा अश्विन देखील याबाबतीत मागे राहिला नाहृी. त्याने येताच विल जॅक्सला शिवम दुबेच्या हाती झेलबाद केले.
Innings Break!
A 🔝 bowling and fielding performance helps #CSK restrict #MI to 1️⃣5️⃣5️⃣ / 9️⃣
2️⃣ points loading for? ⏳🤔
Updates ▶ https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @ChennaiIPL | @mipaltan pic.twitter.com/uUprYxu2gM
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
मुंबईला ३६ धावांत तीन विकेट्स गमावल्यानंंतर चांगल्या भागीदारीची आवश्यकता होती. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा क्रीजवर उपस्थित होते. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये ४० पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली. परंंतु, ही भागीदारी मोठी पातळी होण्यापूर्वीच, महेंद्रसिंग धोनीने चपळता दाखवली आणि सूर्याला यष्टीचीत केले. तो २६ चेंडूत २९ धावा काढून बाद झाला.
दीपक चहरने अंतिम टप्प्यात केली दमदार फटकेबाजी –
मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक ३१ धावा केल्या. त्याच्याशिवाय रॉबिन मिंजने तीन, नमन धीरने १७, मिचेल सँटनरने ११ आणि ट्रेंट बोल्टने एक धाव केली. या सामन्यात दीपक चहर २८ धावांवर नाबाद राहिला. त्याने अंतिम टप्प्यात जोरदार फटकेबाजी केली. त्याचबरोबर सत्यनारायण राजू १ धाव काढून नाबाद परतला. सीएसकेकडून नूर अहमदने चार आणि खलील अहमदने तीन विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय, नॅथन एलिस आणि रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाली. आता घरच्या मैदानावर पहिला सामना खेळणारी चेन्नई ही लढत जिंकू शकते की नाही हे पाहणे बाकी आहे.





