CSK vs DC : MS Dhoni पुन्हा दिल्लीविरुद्ध कर्णधारपद भूषवताना दिसणार? जाणून घ्या काय आहे कारण?

CSK vs DC MS Dhoni likely to lead CSK against Delhi Capitals : आयपीएल २०२५ मधील १७वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिट्लस याच्यात शनिवारी खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि एमएस धोनी यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सीएसकेचे फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांनी संकेत दिले आहेत की दिल्लीविरुद्धच्या सामन्यात धोनी संघाचे नेतृत्व करू शकतो. हा सामना ५ एप्रिलला दुपारी चेन्नईच्या होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. धोनी संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता का आहे? जाणून घेऊया.
चेन्नई सुपर किंग्जचा सध्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे दिल्लीविरुद्धच्या सामन्यात खेळणे संशयास्पद मानल्यानंतर ही बातमी आली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात ऋतुराजला दुखापत झाली होती. तुषार देशपांडेच्या वेगवा चेंडूचा सामना करताना त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
🚨 CAPTAIN MS DHONI IS BACK. 🚨
– MS could lead CSK Vs DC as Ruturaj Gaikwad is doubtful. (Espncricinfo). pic.twitter.com/4q9KysgvQC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 4, 2025
ऋतुराजच्या तंदुरुस्तीबाबत निर्णय येणे अद्याप बाकी –
🚨 MS Dhoni likely to lead CSK again
“Ruturaj Gaikwad’s participation in tomorrow’s game will depend on how well he recovered. He is still sore and we would take a call as to how he bats in the nets today. If he doesn’t play, not sure who will lead. But there is a strong chance… pic.twitter.com/S1MXUalAfL
— RevSportz Global (@RevSportzGlobal) April 4, 2025
सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषदेत, सीएसकेचे फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी म्हणाले की, ऋतुराज गायकवाडच्या खेळण्याची शक्यता त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून आहेत. ऋतुराजला अजूनही काहीशा वेदना होत आहे. आज आम्ही त्याला नेटमध्ये फलंदाजी करताना पाहू, त्यानंतरच तो उद्या खेळू शकेल की नाही हे ठरवले जाईल. जर तो खेळला नाही तर कर्णधार कोण असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु त्याच्या जागी एक युवा यष्टीरक्षक खेळण्याची शक्यता आहे.”
हेही वाचा – LSG vs MI : ‘…आता मला काही करायची गरज नाही’, या वक्तव्यानंतर रोहित शर्मा होतोय ट्रोल, पाहा VIDEO
…तर धोनी करणार सीएसकेचे नेतृत्त्व –
जर ऋतुराज खेळला नाही तर संघ एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळू शकतो. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत ५ आयपीएल आणि २ चॅम्पियन्स लीग जेतेपद जिंकले आहेत. धोनीने शेवटचे २०२३ च्या आयपीएल फायनलमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध सीएसकेचे नेतृत्व केले होते आणि त्या सामन्यात संघाने जेतेपदही जिंकले होते. आतापर्यंत फक्त चार खेळाडूंनी सीएसकेचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये एमएस धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे.





