CSK vs DC Ruturaj Gaikwad Angry on CSK defeat : आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जची निराशाजनक कामगिरी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धही कायम राहिली. एकतर्फी झालेल्या सामन्यात सीएसकेला २५ धावांनी पराभव पत्करावा लागला. या हंगामात चेन्नईचा हा सलग तिसरा पराभव आहे. संघाचे फलंदाज पुन्हा एकदा अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले. दिल्लीने दिलेल्या १८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई निर्धारित षटकात ५ बाद १८५ धावाच करत आल्या. या पराभवानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड चांगलाच संतापला आहे. या सामन्यात चेन्नईने सुरुवातीला आणि शेवटी सतत विकेट गमावल्या, एमएस धोनी आणि विजय शंकर क्रीजवर असूनही, त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड संतापला. त्याने संघाच्या फलंदाजांवर आणि गोलंदाजांवर टीका केली. तिसऱ्या पराभवामुळे कर्णधार ऋतुराज संतापला – दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर ऋतुराज गायकवाड म्हणाला, “गेल्या काही सामन्यांमध्ये निकाल आमच्या बाजूने नसल्याने आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहोत, पण गोष्टी आमच्या मनाप्रमाणे होत नाहीत. अर्थातच, पॉवरप्लेमध्ये आम्ही अनेक विकेट्स गमावल्या, जी चिंतेची बाब आहे. केवळ फलंदाजीच नाही तर पॉवरप्लेमध्ये गोलंदाजीतही सुधारणा करण्याची गरज आहे. आम्ही १५ ते २० धावा जास्त देत आहोत आणि गरजेपेक्षा जास्त विकेट्स गमावत आहोत. आम्ही प्रयत्न करत आहोत, पण गोष्टी आमच्या मनाप्रमाणे होत नाहीत.” हेही वाचा – CSK vs DC : दिल्लीने सलग तिसऱ्या सामन्यात राखलं तख्त! धोनीच्या चेन्नई एक्सप्रेसने साधली पराभवाची हॅट्ट्रिक सर्वांना एकत्र यावे लागेल – सीएसकेचा कर्णधार पुढे म्हणाला, “फलंदाजी करताना तुम्हाला निश्चितच एकही अतिरिक्त विकेट गमवायची नसते. त्यामुळे सर्वांना एकत्र यावे लागेल आणि सांघिक कामगिरी करावी लागले, तरच परिस्थिती बदलेल.पॉवरप्लेनंतर आम्ही सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत राहिलो. आम्ही सामन्यात खूप मागे होतो आणि आमच्याकडे फक्त एकच फलंदाज शिल्लक होता. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्यांनी परिस्थितीचा चांगला फायदा घेतला. जेव्हा शिवम दुबे फलंदाजी करत होता, तेव्हा आम्ही गती शोधत होतो, पण आम्हाला ती मिळू शकली नाही.” हेही वाचा – CSK vs DC : MS Dhoni आज निवृती घेणार? आई-वडील पहिल्यादांच स्टेडियमध्ये सामना पाहायला आल्याने चर्चेला उधाण धोनी-शंकर विजय मिळवून देऊ शकले नाहीत – दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या १८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जने नियमित अंतराने विकेट गमावल्या. रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले तर ऋतुराज गायकवाडलाही फक्त ५ धावा करता आल्या. शेवटच्या षटकांमध्ये विजय शंकर ६९ आणि एमएस धोनी ३० धावांवर नाबाद राहिले पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. दोघांनी मिळून ८४ धावांची भागीदारी केली पण ते मोठे फटके मारण्यासाठी तरसताना दिसत होते. सीएसकेचा हा सलग तिसरा पराभव आहे.