RR vs CSK : वैभवच्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थानचा ऐतिहासिक विजय!! चेन्नई सुपर किंग्सचा ८ विकेट्सनी उडवला धुव्वा
RR vs CSK : आयपीएलच्या 19व्या हंगामाच्या तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ने चेन्नई सुपर किंग्सचा ८ गडी राखून धुव्वा उडवला आहे.

RR vs CSK Rajasthan Royals Historic Win : आयपीएल २०२६ च्या तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) संघाने चेन्नई सुपर किंग्स (CSK) चा ८ गडी राखून धुव्वा उडवला आहे. यासह राजस्थानने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली, तर चेन्नईला आपल्या सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
गुवाहाटीच्या बरसापारा मैदानावर रंगलेल्या या सामन्यात राजस्थानच्या गोलंदाजांनी चेन्नईला अवघ्या १२७ धावांत गुंडाळले. त्यानंतर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या वादळाने चेन्नईच्या हातातून सामना हिरावून घेतला आणि १२.१ षटकात दोन गडी गमावून ऐतिहासिक (सर्वाधिक चेंडू राखून) विजयाची नोंद केली.
Smiles all around the Royals camp! 🩷
A dominant chase completed in just 12.1 overs to seal a wonderful winning start in Guwahati 👏
Scorecard ▶️ https://t.co/UzbuFk5G26#TATAIPL | #KhelBindaas | #RRvCSK | @rajasthanroyals pic.twitter.com/lQ2nnZmqp0
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2026
आयपीएल २०२६ मधील आपल्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली आहे. पावसाळी वातावरण आणि वेगवान गोलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीचा फायदा उठवत राजस्थानचा कर्णधार रियान परागने टॉस जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. चेन्नईचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला आणि अवघ्या १२७ धावांवर संपुष्टात आला.
जुन्या शिलेदाराचा नवा ‘रुद्रावतार’ –
Different threads, same Ravindra Jadeja impact 👊
How good was that performance? ✍️👇
Watch his Royal Return ▶️ https://t.co/uMst1scqXH#TATAIPL | #KhelBindaas | #RRvCSK | @imjadeja pic.twitter.com/pet2gkqJjR
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2026
या हंगामात चेन्नई आणि राजस्थानने आपापले स्टार खेळाडू रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांची अदलाबदल (Trade) केली होती. जडेजाने राजस्थानच्या जर्सीत परतताच पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेत चेन्नईची कंबर तोडली. दुसरीकडे, चेन्नईसाठी पदार्पण करणारा संजू सॅमसन अवघ्या ६ धावांवर बोल्ड झाला. नांद्रे बर्गर आणि जोफ्रा आर्चर यांनी पॉवरप्लेमध्ये भेदक मारा करत ऋतुराज गायकवाड आणि आयुष म्हात्रे यांना स्वस्तात माघारी धाडले. चेन्नईची अवस्था ८ ओव्हरमध्ये ५६/६ अशी झाली होती, पण जेमी ओव्हरटनने ४३ धावा केल्यामुळे त्यांना १२७ पर्यंत मजल मारता आली.
वैभव सूर्यवंशीचं वादळ!
1⃣5⃣-ball FIFTY🔥
That’s the 3⃣rd joint-fastest half-century in #TATAIPL 👏👏
Vaibhav Sooryavanshi goes back for an entertaining 52(17) 👌
Updates ▶️ https://t.co/UzbuFk5G26#KhelBindaas | #RRvCSK pic.twitter.com/NOgpUvNiwL
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2026
१२८ धावांचे साधे लक्ष्य पार करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानला वैभव सूर्यवंशीने अविश्वसनीय सुरुवात करून दिली. त्याने केवळ १५ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान खेळींपैकी एक नोंदवली. वैभव १७ चेंडूत ५२ धावा (५ षटकार, ४ चौकार) करून बाद झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल (नाबाद ३८) आणि कर्णधार रियान पराग (नाबाद १४) यांनी १३ व्या ओव्हरपूर्वीच राजस्थानला विजय मिळवून दिला.
चेन्नईसाठी अंशुल कंबोजने २ बळी घेतले खरे, पण राजस्थानच्या फलंदाजीपुढे चेन्नईचा एकही डावपेच यशस्वी ठरला नाही.





