Mukesh Choudhary Mother Death : मोठी बातमी! सीएसकेच्या स्टार खेळाडूच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर!
Mukesh Choudhary Mother Death : सीएसके संघाचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी याच्या मातोश्री प्रेम देवी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

Mukesh Choudhary Mother Death News : आयपीएल २०२६ च्या धावपळीत चेन्नई सुपर किंग्स (CSK) कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी याच्या मातोश्री प्रेम देवी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. या कठीण प्रसंगात मुकेशने सीएसकेची साथ सोडून आपल्या घरी धाव घेतली आहे.
मुकेशच्या आई प्रेम देवी यांचे मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या गेल्या वर्षभरापासून अस्वस्थ होत्या आणि मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आईच्या निधनाची बातमी समजताच मुकेश तातडीने भीलवाडा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी रवाना झाला.
आईला दिला शेवटचा निरोप –
Heartbreaking news for Mukesh Choudhary 💔
He will miss the game against Mumbai Indians following the passing of his mother
Strength and prayers to him and his family 🙏🤍#MukeshChoudhary #CSKvsMI #IPL2026 pic.twitter.com/OoCItkPB73— CricTracker (@Cricketracker) April 23, 2026
मुकेशचे कुटुंब सध्या महाराष्ट्रात स्थायिक असले तरी, त्याचे मूळ गाव भीलवाडा जिल्ह्यातील परडोदास हे आहे. मुकेशने त्याचे मोठे भाऊ डॉ. राजेश यांच्यासोबत आपल्या ननिहाल ‘गढवालो का खेडा’ येथे पोहोचून आईचे अंतिम संस्कार केले. यावेळी त्याने भावासोबत आईला मुखाग्नी दिली, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. आईच्या निधनामुळे मुकेशवर कोसळलेल्या या संकटामुळे संपूर्ण क्रीडा विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुकेश चौधरीला धोनीने दिला –
मुकेश चौधरी या कठीण काळातून जात असताना, चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभा राहिला आहे. धोनी मुकेशच्या सतत संपर्कात असून त्याला मानसिक आधार देत असल्याचे समजते. चालू हंगामात मुकेशला केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली असून, त्यात त्याने २ विकेट्स घेतल्या आहेत. चेन्नईचा पुढील सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे, मात्र मुकेश या वैयक्तिक आघातातून सावरून कधी मैदानात परतणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.





