nagar | वटपौर्णिमानिमित्त महिलांची गर्दी

राजूर, (वार्ताहर)- राजूरमध्ये वडाची पूजा करण्यासाठी महिलांची एकच गर्दी केली होती. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात.
या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
वडासारखं मोठ आयुष्य आपल्या पतीला मिळावे, यासाठी महिला वडाची पूजा करतात. सौभाग्यचे प्रतीक मानले जाणारे हळदी-कुंकू, काळी पोत, हिरव्या बांगड्या, सौभाग्य अलंकार तेथे अर्पण करतात.
फळांचा राजा आंबा हे तेथे वटवृक्षाची पूजा करताना ठेवतात. दूध साखरेचा नैवेद्यही दाखवतात. वडाच्या झाडाला सफेद दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालतात. शेवटी त्या धाग्याची वडाच्या खोडाला गाठ मारतात. वटपौर्णिमा सण वृक्षांचे जतन संगोपन करण्याचा सामाजिक संदेश देखील देतो.
—





