पुणे जिल्हा | सौरंग्या डेांगरावर भाविकांची गर्दी

पेठ, (वार्ताहर)- श्रीक्षेत्र सौरंग्या देवस्थान येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने येऊन एकमुखी दत्तात्रय प्रभूंच्या मूर्तीचे दर्शन घेतले. सौरंग्या देवस्थान येथे एकमुखी दत्तात्रय प्रभूची मूर्ती असून ती नमस्कारी आहे. श्री दत्तात्रय प्रभूंचे हे अत्यंत जागृत देवस्थान असून अनेक भाविकांना याचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथील भक्तांच्या गर्दीमध्ये वाढच होताना दिसून येत आहे. सलगच्या सुट्ट्यांमुळे भाविकांनी संपूर्ण रस्ता फुलून गेला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक भक्त भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. महानुभव पंथातील अनेक साधुसंत साधक येथे तपश्चर्या करण्यासाठी येत असतात. सततच्या पावसामुळे रस्त्याच्या बाजूची संरक्षक भिंत पडली असल्यामुळे भक्तांच्या सुरक्षेसाठी तिचे काम होणे गरजेचे आहे असे अनेक भक्तांनी सांगितले
सन 1720 ते 1820 मध्ये नानाशास्त्री पंडित यांनी माहूरगड येथे दत्तात्रय प्रभूंची बारा वर्षे अत्यंत खडतर तपश्चर्या केली दत्तात्रय प्रभूंचे आशीर्वाद प्राप्त केले. पुढे त्यांच्या गुरुंनी दृष्टांत दिल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील त्यांच्या गावी सह्याद्री शिखरावर विशेषाची स्थापना कर, तेथे मी भाविक भक्तांची मनोकामना कायमस्वरूपी पूर्ण करत राहील. तेच हे श्री क्षेत्र सौरग्या देवस्थान आहे. -पुरुषोत्तम महानुभव, अध्यक्ष श्री क्षेत्र सौरंग्या देवस्थान





