NRHM उपसंचालकांच्या गाडीत सापडली दीड कोटींची रोकड

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे उपसंचालक डीपी सिंह यांच्या वाहनातून कोट्यवधी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, डीपी सिंह पांढऱ्या स्विफ्ट कारमधून कानपूरला जात होते. दरम्यान त्यांच्या कारमध्ये मोठी रोकड असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई केली. यावेळी सिंह यांच्या कामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची रोकड पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांना सिंह यांना ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतल्यानंतर उपसंचालक डीपी सिंग यांना सरोजिनीनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिस ठाण्यात त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर आयकर विभागाने तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर रोडवर चेकिंगदरम्यान डेप्युटी डायरेक्टर डीपी सिंह यांच्या गाडीचीही तपासणी करण्यात आली यावेळी त्याच्या कारमधून सुमारे दीड कोटी रुपये जप्त करण्यात आले.





