Air India Plane Crash : अपघाताच्या ठिकाणी सापडले 800 ग्रॅम सोने; 80 हजार रोख रक्कमही पीडितांना परत करणार
Updated On:

Air India Plane Crash – अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय-171 (बोईंग 787-8 ड्रीमलायनर) विमानाचा ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणाहून 80 तोळे (800 ग्रॅम) सोने, रू 80,000 रोख, एक मोबाइल फोन, भगवद्गीतेची प्रत, 9 पासपोर्ट आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
घटनेदरम्यान घटनास्थळी पोहोचलेले राजेश पटेल यांच्या मते, जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा अंधार होता. ढिगाऱ्यात एक मोबाइल फोन आणि एक लॅपटॉप सापडला. याशिवाय दागिने, रोख रक्कम आणि पासपोर्ट देखील सापडले. हे सर्व सरकारी अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले आहे. ४-५ बॅगा देखील देण्यात आल्या आहेत.
गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी १५ जून रोजी सांगितले होते की, घटनास्थळावरून जप्त केलेल्या वस्तूंची कागदपत्रे तयार केली जात आहेत. त्यानंतर, मृतांचे सामान त्यांच्या कुटुंबियांना परत केले जाईल.
या घटनेत विमानातील २२९ प्रवासी, १० क्रू मेंबर्स आणि २ पायलट मृत्युमुखी पडले. विमानातील एक प्रवासी बचावला. वसतिगृहात उपस्थित असलेल्या ३४ जणांनाही आपले प्राण गमवावे लागले. त्यात काही स्थानिक लोकांचाही समावेश होता.





