Sachin Pilgaonkar | अभिनेते सचिन पिळगांवकरांचे मनोरंजनसृष्टीत मोलाचे योगदान आहे. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्या वक्तव्यांवरून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. सतत ट्रोलर्सच्या हिटलिस्टवर असलेल्या पिळगांवकरांनी अखेर ट्रोलिंगवर मौन सोडलं आहे. नुकतेच पिळगांवकर यांनी ‘मी होणार सुपरस्टार : छोटे उस्ताद’ या स्टार प्रवाहवरील कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वानिमित्त दिलेल्या एकामुलाखतीत ट्रोल करण्याऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. सचिन पिळगांवकर म्हणाले, ‘मुळात ट्रोलिंग करणाऱ्यांना तुम्ही केलेलं काम माहीत नसेल, तर त्यांना बोलण्यात काही अर्थ नाही. करिअरच्या ६२व्या वर्षी मी त्यांना इतका महत्त्वाचा वाटत असेन, लोकप्रिय असेन, तर आजवर मी जे काही कमावलं, ती परमेश्वराची कृपा आहे. कदाचित टीकाकारांना मी त्यांच्या वयाचा वाटतो, म्हणून ते टीका करतात. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या किती मोठी आहे, याची मला जाणीव आहे. मी काम करत राहणार. तुमचं भलं व्हावं, असा आशीर्वाद टीकाकारांना देईन.’ Sachin Pilgaonkar | याआधी एका मुलाखतीत श्रियाने तिचे वडिल सचिन यांना ट्रोलिंग केले जात असल्याच्या प्रश्नावर म्हंटले होते की, आता या ट्रोलिंगची एवढी सवय झाली आहे की काही वाटेनासं झालं. ट्रोलर्सला काही काम नसल्याने ते आमच्यावर टीका करतात, सोशल मीडियावरचं जग असंच आहे. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करत चांगलं काम करत राहायचं, असा विश्वास श्रियाने व्यक्त केला होता. Sachin Pilgaonkar | हेही वाचा: Anushka Sharma: सलग ६ महिने इडली-सांबर, संध्याकाळी ५.३० वाजताच जेवण; दोन मुलं होऊनही अनुष्का शर्मा इतकी फिट कशी? जाणून घ्या तिची दिनचर्या