Arya Desai Record : २२ वर्षीय खेळाडूने मोडला ख्रिस गेलचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! २१ चौकार अन् १४ षटकारांसह पाडला १९३ धावांचा पाऊस
Arya Desai Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम मोडणं अशक्य मानलं जात होतं, पण गुजरातच्या आर्या देसाईने हे अशक्यही शक्य करून दाखवलं आहे.

Arya Desai broke Chris Gayle record in T20 Cricket : क्रिकेट विश्वात सध्या एका २२ वर्षीय तरुणाची तुफान चर्चा रंगली आहे. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने आयपीएलमध्ये रचलेला १७५ धावांचा ऐतिहासिक विक्रम मोडीत काढण्याचा पराक्रम गुजरातच्या युवा खेळाडूने केला आहे. विशेष म्हणजे, आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी वैभव सूर्यवंशीने हा विक्रम मोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र त्याआधीच ही किमया गुजरातच्या कोणत्या खेळाडूने केली, जाणून घेऊया.
आर्या देसाईने मोडला ख्रिस गेलचा विक्रम –
ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम मोडणं अशक्य मानलं जात होतं, पण गुजरातच्या आर्या देसाईने हे अशक्यही शक्य करून दाखवलं आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशन (GCA) मान्यताप्राप्त ‘सुरत क्रिकेट टी-२० लीग’मध्ये खेळताना आर्याने ८१ चेंडूंमध्ये १९३ धावांची विष्फोटक खेळी साकारली. या खेळीत त्याने २१ चौकार आणि १४ उत्तुंग षटकार ठोकले.
वैभव सूर्यवंशीच्या आधीच आर्याने मारली बाजी –
🚨 HISTORY IN SURAT! 🚨
Arya A Desai has just SHATTERED the record books! 😱
A jaw-dropping 193 runs* off only 75 balls in the Surat Cricket League 2026.
🔥 16 Sixes
🔥 14 Fours
One of the greatest T20 knocks we’ve ever seen! Heartiest congratulations, Arya! 🫡 pic.twitter.com/AtTGPDQK2N— Akash Ghosh (@ghosh_akas67248) March 20, 2026
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशी याने आयपीएल २०२६ च्या सुरुवातीला गेलचा रेकॉर्ड मोडण्याचा मानस व्यक्त केला होता. मात्र, गुजरातच्या या युवा फलंदाजाने स्थानिक स्पर्धेत धावांचा डोंगर उभारत हे स्वप्न सत्यात उतरवले. आर्या देसाई हा यापूर्वी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा भाग राहिला आहे. त्याच्या या कामगिरीने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
रणजी आणि दुलीप ट्रॉफी गाजवणारा तारा –
आर्या देसाई केवळ टी-२० मध्येच नव्हे, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही चमकला आहे. गेल्या रणजी हंगामात त्याने ५०० हून अधिक धावा केल्या होत्या. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याची निवड दुलीप ट्रॉफी आणि भारताच्या अंडर-२३ ‘इमर्जिंग प्लेयर्स’ संघातही झाली आहे.
जीसीएचे सचिव अनिल पटेल यांनी आर्याच्या फलंदाजीचे कौतुक करताना म्हटले की, “आर्या ज्या प्रकारे चेंडू हिट करतो, तसे फटके मारणारा दुसरा खेळाडू मी पाहिलेला नाही. त्याचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे.” सुरत क्रिकेट लीगच्या सहाव्या हंगामात आर्याने केलेली ही कामगिरी त्याच्या आयपीएलमधील पुनरागमनाचे मार्ग मोकळे करू शकते.





