Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्याला मोठं बक्षीस जाहीर
Santosh Deshmukh Murder : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेवर सीआयडीने १ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Santosh Deshmukh Murder : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 14 महिन्यांहून अधिक कालावधी उलटला असतानाही या प्रकरणातील एक मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. या पार्श्वभूमीवर सीआयडी ने मोठा निर्णय घेत आरोपी कृष्णा आंधळे याच्यावर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
या प्रकरणात इतर आरोपींना अटक करण्यात आली असली तरी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. न्यायालयानेही याबाबत सीआयडीला जाब विचारल्यानंतर तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
सीआयडीने जाहीर केले आहे की, कृष्णा आंधळेबाबत ठोस माहिती देणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तसेच माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे. Santosh Deshmukh Murder

Santosh Deshmukh Murder
दरम्यान, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप करत कृष्णा आंधळे गावात येऊन गेल्याचा दावा केला होता. या आरोपांमुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आले होते. Santosh Deshmukh Murder
सध्या पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू असून, बक्षीस जाहीर केल्यानंतर तपासाला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणात फरार आरोपी कधी अटक होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Santosh Deshmukh Murder




