Solapur Crime : सोलापूरात सराईत गुन्हेगारास अटक; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली आहे.

Solapur Crime – गावठी पिस्तुलातून गोळी झाडून एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. रोहित कडलासकर (वय २४, रा. आंबाबाई पटांगण, पंढरपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत केले आहे.
पंढरपूर शहरातील आंबाबाई पटांगण येथील सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या काऊंटरजवळ बसलेले महावीर ऊर्फ लल्या संजय भंगराव यांच्यावर गोळी झाडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेत अभंगराव गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रोहित कडलासकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी आरोपीचा गुन्हेगारी अभिलेख तपासून त्याच्या शोधासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाची दोन स्वतंत्र पथके तयार केली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गुन्हा करून पसार झालेला आरोपी सुरुवातीला लातूर येथे आणि त्यानंतर सोलापूर येथे असल्याचे समोर आले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक सावंजी करीत आहेत.





