Crime News: पिंपळे जगतापमध्ये युवकाचा खून; फरार आरोपींना अटक
Crime News: खुनातील आरोपींबाबत माहिती न देण्याची पोलीस अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना तंबी

शिक्रापूर : पिंपळे जगताप ता. शिरूर येथे 17 जुलै 2026 रोजी एका युवकाचा खून केल्याचे समोर आली. यात कोणताही पुरावा नसताना खुनाचा गुन्हा उघड करून 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र याबाबतची माहिती बाहेर न जाऊन देण्याची पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना तंबी घातल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, एका युवकाचा मृतदेह तलावामध्ये दिसून आला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या युवकाचा गळा चिरून खून केल्याचे उघड झाले. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या टीमने तीन दिवस या प्रकरणाचा सखोल तपास केला.
यादरम्यान कोणताही पुरावा नसताना तसेच खून झालेल्या युवकाबाबत व खून करणाऱ्या हल्लेखोरांबाबत कोणतीही माहिती नसताना पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आणि पुष्कर अरुण यादव, आयुष सुशिल पांडे व सचिन मारूती हिंगेवार या तीन आरोपींना अटक केली.
त्यानंतर चौकशी केली असता गावाकडील जुन्या वादातून त्यांनी सदर युवकाचा खून केल्याचे कबूल केले. मात्र सदर गुन्हा उघड झाल्यानंतर याबाबतची माहिती बाहेर जाऊ न देण्यासाठी पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना तंबी दिल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
Nevase News: घरासमोर लावलेली अॅक्टिव्हा मध्यरात्री आगीत जळून खाक





