Nevase News: घरासमोर लावलेली अॅक्टिव्हा मध्यरात्री आगीत जळून खाक
Nevase News: अज्ञात व्यक्तीने गाडी पेटवून दिल्याचा संशय...

नेवासे – येथील जुन्या बाजारपेठ परिसरात राहणारे किराणा व्यावसायिक योगेश डहाळे यांच्या मालकीची (एम.एच१७ सीझेड ९६१६) क्रमांकाची अॅक्टिव्हा दुचाकी मध्यरात्रीच्या सुमारास आगीत पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीने या दुचाकीला जाणूनबुजून आग लावल्याचा संशय योगेश डहाळे यांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,डहाळे यांनी नेहमीप्रमाणे आपली अॅक्टिव्हा राहत्या घरासमोर उभी केली होती. दरम्यान, रात्री अंदाजे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीला आग लागल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच डहाळे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत दुचाकी पूर्णपणे जळून राख झाली होती.
या आगीची तीव्रता इतकी होती की, शेजारी उभी असलेली शरद वाघ यांच्या मालकीची टीव्हीएस कंपनीची दुचाकीही काही प्रमाणात जळाली. मात्र,स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे ही दुचाकी वेळेत आगीपासून दूर करण्यात आल्याने मोठे नुकसान टळले. (Nevase News)
या घटनेबाबत योगेश डहाळे हे नेवासे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असून,संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर या घटनेमागील मागेचे नेमकं कारण काय? याचा तपास केला जात आहे.
हेही वाचा:





