Crime News : घरफोड्या करणाऱ्या अट्टल आरोपीला शिरूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शिरूर : शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील जांबुत येथे दि. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०४.०० वा. ते दि.२६ ऑक्टोबर रोजी १०.३० वा. च्या दरम्यान तानाजी जगताप यांचे गाळयामधुन फिर्यादी अभिजीत भाउ कोल्हे, (वय २५ वर्ष) दुग्ध व्यवसाय, रा. चोभुत. ता. पारनेर जि. अहमदनगर.
महींद्रा कंपणीचे जनरेटर व बल्क मिल्क कुलर युनिट ८ लाख ७४ हजार २६ रू. किमतीचे साहीत्य कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या अर्थिक फायदयाकरीता चोरून नेले आहे. शिरूर पोलीस स्टेशन गु रजि नं ९०८/२०२४ भारतीय न्याय संहीता ३०५ (ए), ३११ (३) (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा तपास शिरूर पोलीस स्टेशन कडील तपास पथकामधील अधिकारी व अंमलदार करीत असताना जांबुत, फाकटे, कवठे येमाई, मलठण, कान्हुरमेसाई या गावामधील सुमारे ५० पेक्षा अधिक सी.सी. टि.व्ही कॅमेरे तपासुन व तांत्रीक विश्लेशनाचे आधारे सदरचा गुन्हा आरोपी एकनाथ नारायण फलके याने केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीस गुन्हयाचे चौकशी कामी ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे.
आरोपीने रात्रीचे वेळी सदरची घडफोडी करून चोरी केलेले महींद्रा कंपणीचे जनरेटर व बल्क मिल्क कुलर युनिट किंमत ८,७४, २६२/- रूपये हे गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आले आहे. सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे,
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकामधील सहा पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलीस अमंलदार निरज पिसाळ, विजय शिंदे, रघुनाथ हळनोर, नितेश थोरात, निखील रावडे, यांच्या पोलीस पथकाने केली आहे.





