Crime News : मुलींची हत्या करुन आईचीही आत्महत्या; उत्तर बेंगळुरूच्या घरातील धक्कादायक घटना

बंगळुरु – एका २९ वर्षीय विवाहितेने आपल्या दोन मुलींची हत्या करून गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी पती घरी परतला असता सर्वांचे मृतदेह पाहून त्यानेही आत्महत्या केली. उत्तर बेंगळुरूच्या एका घरात ही घटना घडली.
मृतांमध्ये अविनाश, त्याची पत्नी ममता, मुली अनन्या आणि अधीरा यांचा समावेश आहे. एक मुलगी दोन वर्षांची तर दुसरी चार वर्षांची होती. हे कुटुंब मूळचे कलबुर्गी जिल्ह्यातील असून गेल्या सहा वर्षांपासून ते बेंगळुरू येथे वास्तव्यास होते.
कौटुंबिक वादातून महिलेने असे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलिसांनी अंदाज आहे. पुढे पत्नी आणि मुलांच्या मृत्यूने अविनाश इतका व्यथित झाला की, त्यानेही आपले जीवन संपवले.
अविनाशचा धाकटा भाऊ उदयकुमार घरी पोहोचला असता अविनाशचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याची पत्नी व दोन मुलींचे मृतदेह पलंगावर पडले होते. उदय एका शाळेत फिजिकल एज्युकेशन ट्रेनर असून तो अविनाशसोबत राहत होता.
काही दिवसापूर्वी तो कलबुर्गी येथील आपल्या गावी गेला होता. पोलिसांनी ममताविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
बंगळुरूचे डीएसपी सीके बाबा म्हणाले की, शवविच्छेदनानंतर मुलांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्याने सांगितले की, अविनाश सकाळपासून रात्रीपर्यंत कामावर होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.





