Bhanuka Rajapaksa Controversy : स्टार क्रिकेटपटूच्या तक्रारीनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत! कोर्टाने दिले आदेश, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Bhanuka Rajapaksa Controversy : भानुका राजपक्षेने अभिनेत्री हर्षी रसंगाविरुद्ध कायदेशीर लढाई पुकारली आहे.

Bhanuka Rajapaksa Harshi Rasanga Controversy : श्रीलंकेचा आक्रमक फलंदाज भानुका राजपक्षे आणि प्रसिद्ध अभिनेत्री हर्षी रसंगा यांच्यातील वादाने आता कायदेशीर वळण घेतले आहे. ९ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या साखळीवरून सुरू झालेला हा वाद थेट पोलीस कोठडी आणि न्यायालयापर्यंत पोहोचला असून, यामध्ये आता ‘प्रेमप्रकरणा’चा दावाही समोर आला आहे.
भानुका राजपक्षेने अभिनेत्री हर्षी रसंगाविरुद्ध कायदेशीर लढाई पुकारली आहे. राजपक्षेच्या तक्रारीनुसार, त्याने हर्षीला ९ लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी तात्पुरती वापरण्यासाठी दिली होती. मात्र, अभिनेत्रीने ही साखळी त्याला कोणतीही कल्पना न देता परस्पर गहाण ठेवली. या प्रकरणी थलंगगामा पोलिसांनी हर्षी रसंगाला अटक केली होती.
न्यायालयात चूक मान्य, पण बाहेर वेगळाच पवित्रा!
कडुवेला दंडाधिकारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान हर्षीने आपली चूक मान्य केली आहे. गहाण ठेवलेली साखळी आपण राजपक्षेला परत करू, असे आश्वासन तिने न्यायालयाला दिले. त्यानंतर न्यायालयाने तिला ५-५ लाखांच्या दोन जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र, जामीन मिळताच हर्षीने सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे. हर्षीच्या दाव्यानुसार, तिचे आणि भानुकाचे प्रेमसंबंध होते आणि ही साखळी त्याने तिला ‘गिफ्ट’ म्हणून दिली होती.
पुढील सुनावणी २२ एप्रिलला –
भानुका राजपक्षेने या ‘गिफ्ट’ आणि ‘प्रेमसंबंधा’च्या दाव्यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. न्यायालयाने २२ एप्रिल रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत ती सोन्याची साखळी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
भानुका राजपक्षे हा श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू असून त्याने आतापर्यंत ५ वन-डे आणि ४५ टी-२० सामने खेळले आहेत. तसेच आयपीएलमध्ये त्याने पंजाब किंग्सचे प्रतिनिधित्व केले असून २०२२ च्या हंगामात त्याने २०६ धावा केल्या होत्या. आता या मैदानाबाहेरील वादामुळे त्याची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता निर्माण झाली





