Abishek Bail Deny : क्रिकेटपटू अभिषेक पोरेलच्या अडचणींत वाढ! न्यायालयाने जामीन नाकारत पाठवले १४ दिवसांच्या तुरुंगात
Abishek Bail Deny : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली चुंचुरा न्यायालयाने शुक्रवारी पोरेलचा जामीन अर्ज फेटाळत त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Abishek Porel Bail Deny 14 Days Judicial Custody Rape Allegations : दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक-फलंदाज आणि बंगालचा रणजी खेळाडू अभिषेक पोरेल (Abishek Porel) याच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली चुंचुरा (Chinsurah) न्यायालयाने शुक्रवारी पोरेलचा जामीन अर्ज फेटाळत त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मोगरा पोलिसांनी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील दमदम येथील राहत्या घरातून पोरेलला अटक केली होती. सुरुवातीला तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
वैद्यकीय विद्यार्थिनीने नोंदवला गुन्हा!
कर्नाटकातील एका वैद्यकीय विद्यार्थिनीने २३ जून रोजी मोगरा पोलीस ठाण्यात पोरेलविरोधात तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या म्हणण्यानुसार, दोघेही गेल्या साडेतीन वर्षांपासून ‘रिलेशनशिप’मध्ये होते आणि लग्न करण्याचा विचार करत होते. दोघांनी एकत्र परदेश दौराही केला होता. मात्र, नंतर अभिषेक पोरेलने या नात्याला नकार दिला. सुमारे दीड वर्षांपूर्वी दोघांमध्ये वाद होऊन हे प्रकरण ठाण्यापर्यंत पोहोचले होते, परंतु त्यावेळी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.
हायकोर्टाच्या आदेशानंतर झाली अटक!
Delhi Capitals and Bengal cricketer Abishek Porel was denied bail on Friday and remanded to 14 days of judicial custody by a Chinsurah court in connection with a rape and blackmail case filed by a medical student.
Arrested on August 11 in Hooghly, Porel faces charges across 19… pic.twitter.com/PkhH5xnHAP
— The Daily Jagran (@TheDailyJagran) August 14, 2026
पोलिसांनी तपास सुरू केला असता पोरेल चंदननगर येथील निवासस्थानी सापडला नाही. अखेर पीडित तरुणीने कलकत्ता उच्च न्यायालयात (Calcutta High Court) धाव घेतली. उच्च न्यायालयाने २० जुलै रोजी पोलिसांना पोरेलला तात्काळ अटक करण्याचे आणि तक्रारदाराचे फोटो व व्हिडिओ व्हायरल होण्यापासून रोखण्यासाठी त्याचे सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जप्त करण्याचे कडक निर्देश दिले. पोरेलवर बलात्काराव्यतिरिक्त धमकावणे आणि माहिती तंत्रज्ञान (IT Act) कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो पोरेल!
🚨 Abishek Porel Delhi Capitals cricketer arrested.
Look how the police visited Abishek Porel home and arrested him. pic.twitter.com/Y0pWJQafV4
— MARCUS (@MARCUS907935) August 11, 2026
या संपूर्ण प्रकरणात अभिषेक पोरेलच्या एका मित्रालाही सह-आरोपी करण्यात आले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, डावखुरा आक्रमक फलंदाज असलेला अभिषेक पोरेल २०२३ पासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. गेल्या हंगामात त्याने दिल्लीसाठी ४ डावांत १०८ धावा कुटल्या होत्या. मात्र, आता गंभीर कायदेशीर अडचणीत सापडल्यामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





