रोहित-कोहलीने आता निवृत्त व्हावे भारतीय संघाचे न्यूझीलंडकूडन पानीपत झाले. याला जी काही कारणे असतील त्यातील प्रमुख कारण म्हणजे कर्मधार रोहत सऱ्मा व स्टार फलंदाज विराट कोहली यांना आलेले अपयश. या जोडीने एकवेळ खेळपट्टीवर पाय घट्ट रोवून उभे राहण्याचा प्रयत्न केला असता तरीही सामन्याचे चित्र वेगळे दिसले अशते. मनात्र जर तर या गोष्टींलर काहीही होत नाही. वस्तुस्थिती बदलणार नाही हे खेरे. मात्र, आता त्यांचे वारंवार येत असलेले आपयश पाहता या जोडीने आता निवृत्त व्हावे असेच सांगावेसे वाटते. रोहित एखादे किंवा विराट एखादे अर्धसतक फटकावतो म्हणून त्यांची संघातील स्थान निश्चित होते असेच आपण पाहात आहोत मात्र, पुण्याच्या खेळपट्टीवरही त्यांना धावा करता येउ नयेत आचे आश्चर्य वाटते. ही खेळपट्टी फलंदाजीला पोषह होती तरीही ते अपयशी ठरले. या खेळपट्टीवर न्यूझीलंडचे फलंदाज जास्त चांगली फलंदाजी करताना दिसले व भारतीय संघ धावांसाठी झगडताना दिसला. त्यातही रोहित व विराट यांचे अपयश अधोरेखीत झाले. फाफ व्हॉली चेंडू देखली ते प्लेड करुन खेळायचे हे देखिल पाहावत नव्हते. ते भरात असताना या चेंडूंवर षटकार मारत होते. आत्मविश्वासच त्यानी गमावला आहे. नैसर्गिक खेळ त्यांच्यासह अन्य फलंदाजांनाही करता आला नाही. रोहितला पुल मारतानाही जड जात होते तर विराट काहीही कारण नसताना स्ले खेळत होते. मुळतच ॲटॅक इज द बेस्ट वे टू डीफेन्स (आक्रमकत हेत बाचावाचे योग्य धोरण) अशी म्हण आहे. ज्या खेळपट्टीवर चेंडू उमगत नाहीत असे वाटते तेव्हा या म्हणीप्रमाणे फलंदाजी करणे इष्ट ठरते. झे न्युझीलंडला जमले ते भारतीय फलंदाजांना जमू नये. खेळपट्टीवरील भेगा डेव्हलप झाल्या होत्या. अशा खेळपट्टीवर सोमरच्या संघातील कोणत्याही गोलंदाजावर दडपण टाकता आले असते मात्र, हे दोघेही त्यात अपयशी ठरले. रोहित व कोहलीची आधीची खेळी किंवा कामगिरी पाहून त्यांचे संघातील स्थान निश्चत होउ नये. पुर्वपुण्याइ खेळात नसावी. ऑस्ट्रेलियाप्रमाणे कठोर निर्णय घेता आले पाहीजेत मात्र, ही हिंमत निवड समिती दाखवणार का हा खरा प्रश्न आहे. आपल्या निवडसमितीला या दोघांनाही संघातून बाहेर काढणे जमणार नाही. तेवढी त्यांच्यात ताकदच नाही. पण हे असेच सुरु राहीले तर आपण जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचीअंतिम फेरी गाठणे अत्यंत कठीण होणरा आहे. आता या दोन संघातील अखेरच्या तिसर्या कसोटीत तरी भारताने विजय मिळवला पाहीजे अन्यथा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचीअंतिम फेरी गाठण्याच्या शर्यतीतून आपण बाहेर पडू व जागतिक विजेतेपदाचे स्वप्नही स्वप्नच राहील.