Nagar | पतसंस्थांनी आता अद्यावत प्रणाली स्वीकारावी : काकासाहेब कोयटे

नगर, (प्रतिनिधी) – राष्ट्रीयकृत बँका तसेच पतसंस्थेमध्ये ठेवींचे प्रमाण घटत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली आहे. शेअर मार्केट व म्युचिअल फंडामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीत कल वाढलेला दिसून येत आहे.
पतसंस्थांच्या उत्पन्न वाढीकरिता पतसंस्था फेडरेशनने सहकार बास्केट ही नवीन संकल्पना प्रणाली आणली आहे. यामुळे पतसंस्थांना कर्ज देताना योग्य तो निर्णय घेता येईल.
पतसंस्थांनी विविध प्रश्न सोडवण्यासाठी अध्यायवत प्रणालींचा प्रभावीपणे वापर करावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी केले आहे.
हॉटेल श्रद्धा येथे अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्य निधीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी जिल्हा पत.स्थैर्यनिधीचे अध्यक्ष सुरेश वाबळे, उपाध्यक्ष वसंत लोढा, बाळासाहेब उंडे, कडूभाऊ काळे, रमेश झांबरे, पुखराज पिपाडा, शिवाजी कपाळे, सुशीला नवले, उमेश मोरगावकर, डॉ.नरवडे, जिल्हा बँक चे संचालक प्रशांत गायकवाड, आजिनाथ हजारे, प्रकाश गवळी, गोपाळ पाटील आदी उपस्थित होते.
सहकार बास्केटच्या माध्यमातून पतसंस्थांनी आपल्या शहरातील व गावातील उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना क्यू आर कोड उपलब्ध करून दिल्यास खातेदारांना उत्पादनांची खरेदी करणे सोपे होईल. सहकार बास्केट मुळे खातेदारांच्या व्यवसायातही वृद्धी होईल व पतसंस्थांच्या उत्पन्नास वाढ होण्यास मदत होईल.
तसेच महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन यांनी पतसंस्थांच्या सक्षमीकरण करता अक्षर सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मचारी व अधिकारी यांचे प्रशिक्षण घेऊन अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तसेच “क्रास प्रणाली” देखील पतसंस्थांनी घ्यावी, यातून पतसंस्थांचे फसवे कर्जदार समोर येतील. तसेच नवीन अर्जदार खातेदार व कर्जदाराची माहिती टाकल्यास आधार कार्ड वरून गव्हर्मेंट साइटवरून बँका चे सर्व रिपोर्ट मिळतील.
सुरेश वाबळे म्हणाले, स्थैर्यनिधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वसुली अधिकारी नेमून जिल्हातील पतसंस्थांच्या वसुलीसाठी प्रयत्न करणार आहे. उपाध्यक्ष वसंत लोढा म्हणाले, जय सभासदांनी स्थैर्य निधी मध्ये ठेवी ठेवल्या आहेत.
त्यांना सात टक्के व्याजदर दिला आहे. तसेच सहकार खात्याच्या कायद्याविषयी प्रशिक्षण व्हावे. यासाठी लवकरच प्रशिक्षण वर्ग भरविला जाईल. या प्रशिक्षण वर्गासाठी जास्तीत जास्त संस्थांनी सहभागी व्हावे.असे आवाहन वसंत लोढा यांनी केले आहे.





