पुणे जिल्हा | गावाच्या विकासात पतसंस्थांनी भरीव योगदान द्यावे

नारायणगाव, (वार्ताहर) – विक्रांत नागरी पतसंस्थेने कमी कालावधीत चांगली प्रगती केली असून गावच्या विकासात पतसंस्थांनी भरीव योगदान द्यावे, असे नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच व विद्यमान उपसरपंच योगेश पाटे यांनी प्रतिपादन केले.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील श्रीराम नागरी मंगल कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष व वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष संतोष वाजगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विक्रांत नागरी पतसंस्थेच्या आठव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
यावेळी वार्षिक सभेत जे. पी. भोसले, हितेश कोराळे, हनुमंत पवार, नवनाथ हांडे, सल्लागार किरण वाजगे, अॅड. विजय वाजगे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
श्री आनंद पतसंस्थेचे संस्थापक अशोक गांधी यांनी पतसंस्थेने आठ वर्षांत 31 कोटी ठेवीचा टप्पा पार केल्याबद्दल अभिनंदन केले. माजी आमदार शरद सोनवणे यांनी संस्थेने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले.
विक्रांत नागरी पतसंस्था पुढील काळात 100 कोटीचे उद्दिष्ट पूर्ण करेल, असे संस्थेचे अधक्ष संतोष वाजगे यांनी सांगितले. सभेत पतसंस्थे समोरील आव्हाने व बदलणारे नियम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रम पत्रिकेतील विषय सचिव निलेश गोरडे यांनी तर मागील सभेच्या सभा वृत्तांताचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल शिंदे यांनी वाचन केले. सुजित खैरे यांनी आभार मानले.
संस्थेची आर्थिक परिस्थिती
सभासद संख्या : 1693
लाभांश : 8 टक्के
अधिकृत भाग भांडवल : 1 कोटी 50 लाख
उद्दिष्ट : अधिकृत भाग भांडवल पाच कोटी करणे
संस्थेच्या ठेवी : 31 कोटी 71 लाख
कर्जवाटप : 23 कोटी 23 लाख
वसूल भाग भांडवल : 1 कोटी 50 लाख
गुंतवणूक : 12 कोटी आठ लाख
नफा : 48 लाख 11 हजार
वैयक्तिक भागीधारकांची कर्ज मर्यादा 2 लाखांवरून पाच लाख करणे
एक हजारांपेक्षा अधिक भाग धारण करणार्या सभासदांचा दोन लाखांचा अपघात विमा उतरवला आहे.





