Covid vaccination | मनसेतर्फे 300 हून अधिक नागरिकांना युनिव्हर्सल पासचे वाटप
Updated On:

पुणे (प्रतिनिधी) – येथील जनवाडी गोखलेनगर प्रभागात कोवीड लसीचे दोन डोस घेतलेल्या 300 हून अधिक नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व निलेश प्रकाश निकम यांच्या माध्यमातून युनिव्हर्सल पासचे वाटप करण्यात आले.
या पासचा उपयोग रेल्वे, विमानतळ, मॉल अशा अनेक ठिकाणी उपयोग होतो. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अक्षय पवार, साहिल कंट्रोल्लू,संदेश जोशी, सत्यम जाधव, कुणाल हेंद्रे, महेश हेंद्रे, निखिल जोशी, स्वप्नील जोशी, विनोद वाघमारे, साहिल साळुंखे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.




