Pune News : सोन्याचे दागिने चोरणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक
Pune News : पुण्यातील नऱ्हे परिसरात बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या एका सराईत टोळीचा नऱ्हे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Pune News : नऱ्हे परिसरात बंद घराचे कुलूप उघडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या जोडप्यासह तिघांना नऱ्हे पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी या घरफोडीचा छडा लावला. या कारवाईत एक लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. (Pune News)
संचिता सचिन गोसावी ऊर्फ कदम ( ४२), दत्ता अरुण कदम ( ३९) आणि दीपक बाळू ढेरंगे (३४, तिघेही रा. शुभंकर हाईट्स, सर्व्हे अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune News)
याप्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या बंद घराचे कुलूप उघडून एक लाख रुपये किमतीचा ४.९५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार, २५ हजार रुपये किमतीचे २.५४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स आणि २५ हजार रुपये रोख, असा ऐवज चोरला होता. (Pune News)
गुन्हा घडला, त्या वेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नव्हता. तसेच चोरी करताना आरोपीने चेहरा झाकून ठेवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते, यामुळे गुन्ह्याचा छडा लावणे पोलिसांसमोर आव्हान होते. (Pune News)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील तसेच आरोपींच्या संभाव्य मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. (Pune News)
पोलीस अंमलदार प्रणिल मेस्त्री यांनी आरोपींच्या हालचालींचे तांत्रिक विश्लेषण केले. तपासादरम्यान आरोपी नऱ्हे येथील अभिनव कॉलेज रोडवरील माऊली मंगल कार्यालयाजवळील एका इमारतीत राहत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. (Pune News)
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे आणि तपास पथकाने तेथे जाऊन शोध घेतला. त्या ठिकाणी संचिता गोसावी-कदम, दत्ता कदम आणि दीपक ढेरंगे हे तिघे आढळले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर तिघांना अटक करून चोरीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे पुढील तपास करीत आहेत. (Pune News)
आरोपी सराईत गुन्हेगार
आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर शिक्रापूर, चिपळून आदी परिसरात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्हयात ते जामिनावर बाहेर आहेत. मागील तीन ते चार महिण्यापुर्वी ते नऱ्हे परिसरात रहायला आले आहेत. (Pune News)
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
अपर पोलीस आयुक्त, राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त, डॉ. सागर कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (Pune News)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण यांच्या सूचनांनुसार पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रणिल मेस्त्री, निलेश भोरडे, पांडुरंग पवार, देवा चव्हाण, स्वप्नील सूर्यवंशी, सुनील चव्हाण, राजू तोरे, सुमित जगताप, नितीन वाघमारे, धुळा गारळे, गोविंद कपाटे आणि कार्तिक कोंडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. (Pune News)





