Real Estate : गोखले कंस्ट्रक्शन्सच्या नवरात्रातील भव्य गृहमहोत्सवाचे उद्घाटन, घरखरेदीची संधी; 27 टक्क्यांपर्यंत सवलत
Real Estate : गोखले कंस्ट्रक्शन्सच्या नवरात्र गृहमहोत्सवाला सुरुवात. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान घरखरेदीदारांना ९, १८ आणि २७ टक्क्यांपर्यंत सवलतीची संधी.

Real Estate : गोखले कंस्ट्रक्शन्सच्या नवरात्रातील भव्य गृहमहोत्सवाला घटस्थापनेच्या दिवशी सुरुवात झाली. या महोत्सवाचे हे सलग १४ वे वर्ष आहे. महोत्सवाचे उद्घाटन या फेस्टिव्हलमध्ये पहिले बुकिंग करणारे ग्राहक गोपीनाथ बापट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी गोखले कंस्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले, पूनम, अर्चित आणि अन्वी गोखले तसेच मनाली बापट उपस्थित होते.
यंदाच्या नवरात्र महोत्सवात घरखरेदीदारांना सदनिकेच्या किमतीवर ९, १८ आणि २७ टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार असल्याची माहिती विशाल गोखले यांनी दिली. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान हा महोत्सव सुरू राहणार आहे.
मयूर कॉलनी, कर्वे नगर, सहकार नगर, प्रभात रोड, करिष्मा चौक-कोथरूड, डीपी रोड कोथरूड आणि सीटी प्राईडजवळील कोथरूड येथे सुरू असलेल्या निवासी प्रकल्पांमध्ये २ बीएचकेपासून ६.५ बीएचके स्काय व्हिलापर्यंत पर्याय उपलब्ध आहेत. या सदनिकांची किंमत अंदाजे १.६ कोटी रुपयांपासून पुढे आहे.
बाणेर, बावधन, औंध, हिंजवडी आणि बोट क्लब रोड येथे आगामी काळात नवीन प्रकल्प सुरू केले जाणार असल्याचेही गोखले यांनी सांगितले. तसेच ‘गो केअर’, ‘गो मूव्ह’, ‘गो ग्रीन’, ‘गो सेल’, ‘गो रेंटल्झ’, ‘गो बाय’, ‘गो मॉडीफाय’, ‘गो अर्न’, ‘गो फर्निश’ आणि ‘गो लीजइझी’ अशा नवीन सेवा सुरू करण्यात येणार आहेत.
हा गृहमहोत्सव गोखले हाउस, आयकर कार्यालयाजवळ, प्रभात रस्ता येथे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवातील प्रकल्प रेरा नोंदणीकृत असल्याचे कंपनीने सांगितले.





