काउंटी क्रिकेट लाभदायक ठरले – पुजारा
Updated On:

लंडन – इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये चार शतके फटकावलेल्या भारताच्या चेतेश्वर पुजाराने आयपीएल स्पर्धेत मला कोणत्याही संघाने घेतले नाही. त्यामुळे या स्पर्धेत खेळता आले नाही हे चांगलेच झाले, असे वक्तव्य त्याने केले आहे. जर मला कोणत्या संघाने खरेदी केले असते तर मला अंतिम 11 खेळाडूंच्या संघात फारशी संधीही मिळाली नसती.
त्यापेक्षा मी इंग्लंडला जाऊन काउंटी क्रिकेट खेळलो तेच माझ्यासाठी लाभदायक ठरले व कसोटी संघात पुनरागमन करू शकलो, असेही पुजाराने म्हटले आहे.





