Chief Minister Devendra Fadnavis : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मोठ्या उत्साहात मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या निव़डणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतदानाचा निकाल जाहीर करण्यात येणार होता. पण आता ३ डिसेंबरला निकाल जाहीर न करता २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाचा निकाल २१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याचा सर्वात मोठा निर्णय मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठाने घेतला आहे. त्यामुळे आता २ डिसेंबर आणि २० डिसेंबर या दिवशी होणाऱ्या मतदानाची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतलेल्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर खंडपीठाच्या निकालावर फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली असून अनेकांचा भ्रमनिरास झाला असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी ही अतिशय चुकीचे घडले आहे, अशा पद्धतीने निवडणुका पुढे जाणे हे यंत्रणेचे अपयश असल्याची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कुणीतरी कोर्टात गेले म्हणून पुढे निवडणुका ढकलेले योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. घोषित केलेल्या निवडणुका त्यांचे निकाल पुढे चाललेले आहेत. मला असं वाटत की एकूणच ही पद्धत फार योग्य नाही. नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल मान्य करावा लागेल. पण यातून जे उमेदवार आहेत, मेहनत करतात. त्यांचा भ्रमनिरास होतो. मला वाटतं हे योग्य नाही. अशा खूप निवडणुका राज्य निवडणूक आयोगाला घ्यायच्या आहेत, या सगळ्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला सुनावले. ती नाराजी निवडणूक आयोगावर नाही, तर….. किमान आता पुढच्या निवडणुकात असे होता कामा नये, असे देखील त्यांनी ठणकावून सांगितले. जो काही कायदा आहे त्याचे चुकीच्या पद्धतीने अवलोकन करण्यात आलेले आहे. माझी नाराजी मी कालच प्रकट केली असून, ती नाराजी निवडणूक आयोगावर नाही, तर कायदेशीर रित्या होत नाही याच्यावर असल्याचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. हेही वाचा : मोठी बातमी! नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला नाही; तर ‘या’ दिवशी होणार सर्व मतमोजणी