Cotton Candy । सावधान..! तुम्हीही ‘कॉटन कॅंडी’ खाताय मग ही बातमी एकदा वाचाच..

Cotton Candy । तुम्हीही तुमच्या मुलांसाठी जत्रेत किंवा बाजारात ‘कॉटन कॅंडी” विकत घेत असाल तर सावधान.. लहान मुलांमध्ये खूप लोकप्रिय असलेल्या या गोड ‘कॉटन कॅंडी’मध्ये कॅन्सर निर्माण करणारे रसायन आढळले आहे. साखरेपासून तयार होणाऱ्या या गोड पदार्थाला भारतात भरपूर प्रमाणात खाल्या जाते.
याच ‘कॉटन कॅंडी’ची अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, कॉटन कँडीमध्ये रोडामाइन-बी रसायन आढळले. हे रसायन कापड उद्योगात सर्रास वापरले जाते आणि ते खाल्ल्यास कर्करोग होऊ शकतो. हा अहवाल पुद्दुचेरी आणि आता तामिळनाडू येथे समोर आला आहे. पुद्दुचेरी आणि आता तामिळनाडू सरकारने यावर आता बंदी घातली आहे.
कॉटन कँडीवरील बंदीची घोषणा करताना, तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम सुब्रमण्यम म्हणाले की, रंगीत कँडीमध्ये असलेल्या हानिकारक रसायनांबद्दल कँडी उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे.
यासोबतच ते म्हणाले की, रंगीबेरंगी कँडी जरी रुचकर वाटत असली तरी ती आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. “एकदा जागरुकता निर्माण झाली की, अन्न सुरक्षा अधिकारी हे सुनिश्चित करतील की केवळ रंगविरहित कॉटन कँडी विकली जाईल,”
पुद्दुचेरी सरकारनेही घातली बंदी
पुद्दुचेरी सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला कॉटन कँडीवरही बंदी घातली होती. तेथे घेतलेल्या नमुन्यांची तपासणी केली असता, गुलाबी रंगाच्या कॉटन कँडीमध्ये रोडामाइन-बी रसायन असल्याचे आढळून आले, तर निळ्या रंगाच्या कँडीमध्ये रोडामाइन-बीसह आणखी एक अज्ञात रसायन मिसळले आहे. या नमुन्यांच्या ग्राहकांनी कॉटन कँडीचे दोन्ही रंग निकृष्ट आणि आरोग्यासाठी हानिकारक मानले.
हेही वाचा
महायुतीकडून शिर्डी लोकसभेसाठी खासदार सदाशिव लोखंडे की,बबनराव घोलप?
Baramati Lok Sabha Candidate । सुप्रिया सुळे यांचे दादांना ओपन चॅलेंज, ‘तुम्ही म्हणतील ती जागा, वेळ अन् ठिकाण’





