Coronavirus : देशातील करोनाचा आलेख वाढताच..! एका दिवसात ६५६ केसेस
Updated On:

नवी दिल्ली – देशातील कोविड रूग्णांची संख्या पुन्हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोविडचे ६५६ रूग्ण आढळून आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. त्यामुळे देशातील सक्रिय रूग्णांची संख्या आता ३७४२ इतकी झाली आहे.
गेल्या २४ तासांच्या कालावधीत केरळमध्ये एका कोविड रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मधल्या काळात कोविड पुर्णपणे आटोक्यात आला होता व देशातील दैनंदिन रूग्णांचे प्रमाण जेमतेम ४० ते ५० वर आले होते. पण आज ते ६५६ वर गेली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशातील सगळ्याच वैद्यकीय संस्था आता सतर्क झाल्या आहेत.





